जामखेड न्युज——
महाराष्ट्र लोकविकास मंच संघटनेच्या वतीने आदिवासी भटके विमुक्त महिला यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या द्वारका पवार यांना पुरस्कार
गोर गरिब आदिवासी भटके विमुक्त महिला यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या द्वारका पवार यांना पुरस्कार झाला जाहीर करण्यात आला आहे यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील गोरगरीब आदिवासी भटके विमुक्त यांच्या हक्क व अधिकार, अत्याचार महिला व नागरिकत्वाचा पुराव्यासाठी लढणाऱ्या ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या पदाधिकारी द्वारकाताई पवार या आदिवासी महिलेस व महाराष्ट्र मधील वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला जाणारा महाराष्ट्र लोकविकास मंच या संघटनेच्या वतीने दिला जाणारा मानाचा पुरस्कार यासाठी द्वारका ताई पवार यांची निवड करण्यात आलेली आहे.
गेली अनेक दिवस अहमदनगर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होणारे अन्याय अत्याचार यांच्या विरोधामध्ये आंदोलन करून न्याय मिळवून देण्याचे काम लढ्याच्या माध्यमातून केले आहे तसेच एकल महिला, घरेलू महिला, पारधी विकास आराखडा अनेक मुद्द्यावरती यांनी काम केले आहे.
या कामाची पावती म्हणून पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली कळविले आहे. अशी माहिती मा.श्री.विश्वनाथ तोडकर (अण्णा) महाराष्ट्र लोकविकास मंच अध्यक्ष यांनी निवडीचे पत्र देवून अभिनंदन केले. हा पुरस्कार १० डिसेंबर २०२३ रोजी कळंब जिल्हा धाराशिव येथे देण्यात येणार आहे. अशी माहिती मा.भुमीपुत्र वाघ महाराष्ट्र लोकविकास मंचाचे महासचिव यांनी दिली. हा पुरस्कार मिळाल्यामुळे महाराष्ट्रातून द्वारकाताई पवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सुजाताई खांडेकर ( कोरो), सुभाष वारे सर, महेंद्रभाऊ रोकडे, मुमताजताई शेख, अॅड.डॉ अरुण (आबा) जाधव, सुरेश जाधव मा. उपसरपंच जामखेड, उमा जाधव, विशाल पवार, बापूसाहेब ओव्हळ,सचिन भिंगारदिवे मायलेकरू समन्वयक, वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे, शहरअध्यक्ष अजिनाथ शिंदे, संतोष चव्हाण निवारा बालगृह व्यवस्थापक, वैजिनाथ केसकर निवारा बालगृह अधीक्षक, ऋषिकेश गायकवाड, राजू शिंदे, नंदु गाडे सर, लता सावंत, पल्लवी शेलार, उज्वला मदने, रेश्मा बागवान, शहानुर काळे, आलेश शिंदे, डिसेना पवार, नरसिंग भोसले, या सर्वांनी अभिनंदन केले.