सौताडा धबधबा येथे बुडालेल्या काॅलेज तरूणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला

0
2848

जामखेड न्युज——

सौताडा धबधबा येथे बुडालेल्या काॅलेज तरूणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला

 

मिनी महाबळेश्वर असलेल्या जामखेड पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधबा पाहणीसाठी गेलेल्या बीडमधील तरूण मित्रांसोबत पोहताना दोन दिवसा पूर्वी धबधब्यात बुडाला होता. यानंतर गावातील नागरिकांसह पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शोधमोहिम करण्यात आली मात्र तीसरा दिवस उजडला असतांनाही यश चव्हाण मृतदेह शोधण्यात जिल्हा प्रशासनाला यश येत नव्हते.


या घटनेची माहिती आमदार रोहित पवार व आमदार बाळासाहेब आजबे यांना दिल्यानंतर त्यांनी पुणे येथील रेस्क्यू टीम यांना प्रचारण केले. या टीमने बुधवारी सकाळी मृतदेह धबधबा खाली शोधण्यास सुरुवात केली अवघ्या काही मिनिटांमध्ये पुण्यातील रेस्क्यू टीमने हा मृतदेह शोधला मृतदेह सापडतात नातेवाईकांनी टाहो फोडला.


यावेळी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार बालाजी चितळे पोलीस निरीक्षक मनिष पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल केशव तांदळे पोलीस हेडकॉन्स्टेबल उबाळे पोलीस उप निरीक्षक कोळेकर. पोलीस उपनिरीक्षक पतंगे तलाठी शिंदे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


टाकरण तांडा येथील यश गुलाब चव्हाण (वय २१) वर्षे बीड येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी आपल्या मित्रासोबत पर्यटन स्थळ असलेल्या सौताडा येथील धबधबा पाहण्यासाठी आला होता. देवदर्शन घेतल्यानंतर पाण्यात पोहण्याचा मोह झाला पाण्यात उडी मारून पोहण्याचा आनंद घेत होते.

मात्र अचानक दम लागल्याने पोहतांना यश चव्हाण पाण्यात बुडाला. यावेळी उपस्थित नागरिकांकडून
शोधण्याचा प्रयत्न केला परंतू यश मिळाले नसल्याने मित्रांनी पाटोदा ठाण्यात धाव घेत झालेली घटना सांगितली.

त्यानंतर पोलीसांकडून सोमावारी सांयकाळी भेट देत शोध मोहिम करण्यात आली परंतू सोमवारीही यशचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर मंगळवारी सकाळ पासून पोलीस प्रशासन, वन विभाग आणि ग्रामस्थ व नातेवाईकांकडून दिवसभर आणि रात्री दहा वाजेपर्यंत शोधमोहीम करूनही यशचा मृतदेह सापडला नसल्याने नातेवाईकांकडून जिल्हा प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता.

यश चव्हाणचा मृतदेह बुडून तीन दिवस उजाडले असतांनाही जिल्हा प्रशासन गंभीर दखल घेत नसल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात होता. ही बातमी आमदार रोहित पवार व आमदार बाळासाहेब आजबे यांना समजतात त्यांनी एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण केले आणि तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला.

यशचे मृतदेह शोधण्यासाठी इतर टीम बोलविण्याची मागणी नातेवाईक यांनी केली होती. यावेळी जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित दादा पवार आमदार बाळासाहेब आजबे यांनी पुणे येथील रेस्क्यू टीमला सहकार्य करण्यास विनंती केली. यावेळी ही टीम सौताडा येथे दाखल होऊन बुधवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान मृतदेह बाहेर काढला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here