जामखेड न्युज—–

कर्जत – जामखेड तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त पदांचे नव्याने आरक्षण जाहीर
पहा आपल्या गावात काय आहे आरक्षण
सहा महिन्यांपुर्वी कर्जत जामखेड तालुक्यातील ११४ गावातील रिक्त पोलीस पाटील पदांचे आरक्षण कर्जत प्रातांधिकारी यांनी एप्रिल महिन्यात काढले होते. पण याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे काही तक्रारी दाखल झाल्या होत्या.
यानुसार जिल्हाधिकारी यांनी सर्व आरक्षण प्रक्रिया रद्द केली होती. आणि पुन्हा काल कर्जत जामखेड तालुक्यातील ११४ गावातील रिक्त पोलीस पाटील पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील ६६ तर जामखेड तालुक्यातील ४८ गावातील रिक्त पोलीस पाटील पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
एप्रिल महिन्यात काढण्यात आलेल्या आरक्षणात काही गावात त्या प्रवर्गातील लोकसंख्या नसताना आरक्षण निघाले अशी तक्रार होती.
लोकसंख्येनुसार आरक्षण नव्हते तेव्हा जिल्हाधिकारी यांनी सर्व आरक्षण प्रक्रिया रद्द केली होती आणि पुन्हा नव्याने काल ११४ गावातील पोलीस पाटील रिक्त पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.