कोठारी परिवाराने झाडाच्या रूपाने जपल्या संदेशच्या आठवणी

0
1146

जामखेड न्युज——

कोठारी परिवाराने झाडाच्या रूपाने जपल्या संदेशच्या आठवणी

 

आपल्या मुलाची आठवण कायमस्वरूपी राहावी यासाठी माजी सरपंच सुनिल कोठारी व कोठारी परिवाराने कै. संदेश कोठारी यांच्या अस्थींचे पाण्यात विसर्जन न करता त्या आपल्या शेतात पुरून त्याच्यावर केशर आंब्याचे झाड लावले आहे. यातून त्यांनी समाजापुढे एक आदर्शच घालून दिला आहे.


जामखेड येथील माजी सरपंच सुनील कोठारी यांच्या मुलगा संदेश कोठारी यांचे दि. २५ नोव्हेंबर रोजी वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी अपघाती निधन झाले. त्याच्यावर जामखेड येथील कोठारी फार्म नगर रोड येथे दि. २६ नोव्हेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

त्यानंतर अस्थी विसर्जना वेळी आपल्याला रोज आपल्या मुलाला पाहता येईल या दृष्टीने स्वतःच्या शेतामध्ये एक खड्डा खोदून त्या खड्ड्यात अस्थी विसर्जन करून नवकार मंत्राचा जापत करत त्या ठिकाणी कलमी आंब्याचे मोठे झाड लावण्यात आले. नदीपात्रात आस्थी विसर्जन करून पाणी दूषित करण्यापेक्षा अशा प्रकारे समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी माजी सरपंच सुनील कोठारी, कोठारी प्रतिष्ठाचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पारस कोठारी, दिलीप बोरा, सतीश बोरा, तेजस कोठारी, संकेत कोठारी, हर्षल कोठारी, सार्थक कोठारी, प्रतिकेश बोकरिया, प्रफुल्ल सोळंकी, चेतन सुराणा, गणेश लुंकड, ॲड. सुमतीलाल बलदोटा, ओंकार देशमुख, संस्कार कोठारी, प्रतीक कोठारी, मोहन पवार, श्रीराम लटपटे, शिवाजी गर्जे, मनोज दुगड, राहुल राखेचा, निलेश दुधडिया, गौतम बाफना, प्रशांत बोरा, मंगेश बेदमुथ्था, तुषार बोरा, संजय देसरडा, दुष्यंत नाहटा, तेजस बोरा, रोहित नाहटा, अभिमन्यू कोठारी, केतन बोरा, कुणाल बोरा, सिद्धार्थ कोठारी, अरूष कोठारी, मयूर देसडला, संजय देसडला, योगेश भंडारी, सचिन मुळे, रवींद्र राळेभात, महेश खरात, शिवाजी गर्जे, संतोष सानप, हरिभाऊ वणवे, विनोद वाडकर उपस्थित होते.

यावेळी सुनील कोठारी म्हणाले की, माझा मुलगा संदेश हा कमी वयात गेला. खूप दुःख झाले. परंतु तो डोळ्यासमोर दिसावा यासाठी त्याच्या अस्थी स्वतःचे शेतात पुरून त्याच्यावर झाड लावले आहे.

ते झाड ऑक्शिजन तर देईलच परंतु आमच्या मनात तो रोज समोर दिसेल. आम्ही मुलगा संदेशला संभाळल्या प्रमाणेच झाडाला सुद्धा सांभाळून त्याचे संगोपन करणार आहोत. तसेच साधुसंत उतरण्यासाठी याच शेतामध्ये विहारधाम सुसज्ज प्रकारचे बांधून घेणार आहे. यामध्ये जैन साधू साध्वी उतरून धर्म साधना होईल व आमच्या परिवाराला सेवा करण्याची संधी मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here