जामखेड न्युज——
नागेश विद्यालयातील शिक्षक शिंदे बी. एस. यांची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप २४ साठी निवड.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप 12 डिसेंबर 2021 पासून दरवर्षी देण्यात येते. या अंतर्गत कृषी साहित्य, शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना फेलोशिप प्रदान करण्यात येते.
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन साठी राज्यभरातून 30 फेलोंची निवड केली आहे.त्यांना साठ हजार रुपये फेलोशिप व प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन यशवंत राव चव्हाण सेंटर मुंबई येथे मा.खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
श्री नागेश विद्यालय जामखेड येथे येथील उपक्रमशील शिक्षक श्री शिंदे बी.एस.यांची शरद पवार फेलोशीप इन एज्युकेशन साठी निवड झालेली आहे.त्यांनी दिव्यांग मुलांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या नवोपक्रमा साठी त्यांची निवड केलेली आहे.
यासाठी त्यांना कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार मा. रोहित दादा पवार, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय सहाय्यक निरीक्षक काकासाहेब वाळुंजकर साहेब व शिवाजीराव तापकीर साहेब,नागेश विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री मडके बी.के सर व पर्यवेक्षक श्री कोकाटे व्ही.के.सर यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.
नागेश विद्यालय सर्व सहकारी शिक्षक व जामखेड तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.