जामखेड न्युज——
शिक्षण विभागातील दलाली बंद करणारच – आमदार किशोर दराडे
नगर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्यासाठी प्रयत्न करणार
शिक्षण विभागात अनेक अनिष्ट प्रथा आहेत यामुळे अनेक शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. याचा मोठा मानसिक त्रास शिक्षकांना सहन करावा लागतो. या सर्व अनिष्ट प्रथा व दलाली आपल्याला सर्वाच्या सहकार्याने बंद करावयाची आहे. तसेच शिक्षकांचे पगार कोणत्या बँकेत ठेवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी नाशिक जिल्ह्यातील सहकारी बँकेचा संचालक असताना नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. नगर जिल्ह्यातील शिक्षकांचे का नाहीत असा प्रश्न उपस्थित केला येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न प्राधान्याने मांडणार आहे.
नाशिक विभागातील शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या विकास निधीतून तालुक्यातील तेरा शाळांना आज ल. ना. होशिंग विद्यालयातील ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात संगणक वाटप करण्यात आले. यावेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मिथुन डोंगरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, दशरथ कोपनर, आप्पा शिरसाठ, दत्ता काळे, श्रीधर जगदाळे, रमेश अडसूळ, शंकरराव खताळ, रत्नपारखी सर, बी. ए. पारखे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुक्याध्यक्ष पी. टी. गायकवाड, संजय हजारे, भरत लहाने, मयूर भोसले, अनिल देडे, पोपट जगदाळे, रोहित घोडेस्वार, राजकुमार थोरवे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, सचिन वराट, बाजीराव गर्जे, संतोष पवार, बबन राठोड, सुर्यकांत कदम यांच्या सह अनेक शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार दराडे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात भरपूर प्रश्न आहेत. ते सोडवायचे आहेत जुनी पेन्शन सर्वासाठी महत्त्वाची आहे. आणी गरजेची आहे. ती मिळालीच पाहिजे यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सुप्रिम कोर्टातील सर्व खर्च मी करत आहेत. जुन्या पेशन्स साठी मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र सचिव लोक चुकीची माहिती देतात. यामुळे शिक्षक जुन्या पेशन्स पासून वंचित आहेत.
शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. यात मध्यस्थ दलाली मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. तिचा बिमोड करायचा आहे. यासाठी आपले सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे.
मी नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचे डीसीपीएस, एनपीएस व भविष्य निर्वाह निधी खाते एकत्रित केले आहे. नगर जिल्ह्यातही लवकरच करू असेही सांगितले. तसेच शिक्षकांचा पगार एक तारखेलाच झाला पाहिजे.
यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग, आप्पा शिरसाठ,
मुथून डोंगरे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार किशोर दराडे हे
शाळा सुधारण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात काहीना काही दिले आहे. आज तेरा शाळेतील शाळांना संगणक वाटप करण्यात आले. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी दिंडी काढणारा पहिला आमदार आहे. हे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सतत झटणारे आमदार आहेत.
कार्यक्रमाचे प्रस्तावित पी. टी. गायकवाड यांनी केले यावेळी ते म्हणाले की, शिक्षकाच्या प्रश्नांसाठी लढणारा एक सच्चा वारकरी म्हणजे आमदार किशोर हे आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे यांनी केले.