जामखेडच्या शैक्षणिक विकासातील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी हे दोन अनमोल हिरे -प्रा.सचिन गायवळ

0
569

जामखेड न्युज——

जामखेडच्या शैक्षणिक विकासातील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी हे दोन अनमोल हिरे -प्रा.सचिन गायवळ

 

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी जामखेडचा पदभार स्वीकारल्यापासून शैक्षणिक विकासासाठी झपाटून कामाला लागले व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक तर कामचुकार शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलला दोन्ही अधिकाऱ्यांमुळे जामखेडची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली आहे. यामुळे जामखेडचे शिक्षण क्षेत्रातील हिरे आहेत. असे प्रा. सचिन गायवळ यांनी सांगितले. 

शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक मेहनतीने काम करत असून त्यांना मोलाची साथ व प्रेरणा गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे दोघे देत आहेत हे दोन्ही आपल्या तालुक्यासाठी अनमोल हिरे आहेत. यामुळे शैक्षणिक विकास होत आहे. यामुळे जामखेड तालुका नक्कीच गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर येईल असा विश्वास बास्केटबॉल संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व पुणे जिल्हा अध्यक्ष व जामखेड चे भूषण प्रा. सचिन गायवळ यांनी व्यक्त केला.

त्यावेळी समस्त भीमसैनिकांचा बुलंद आवाज सामाजिक कार्यकर्ते मा. विकीभाऊ सदाफुले, गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे आदी मान्यवर उपस्थित होते.


जामखेड गटशिक्षणाधिकारी कार्यालयात त्यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांचा झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी शिक्षण विभागाला चांगले मार्गदर्शन केले, तसेंच भविष्यात पाहिजे ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.


त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी ही जामखेड तालुक्यातील शिक्षण विभागाचे काम चांगले असून वेगाने प्रगती होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. गोरगरिब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत असल्याचे सांगितले त्यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

जामखेड तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे खरे योगदान आहे. प्रा. सचिन गायवळ सरांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here