जामखेड न्युज——
बेरोजगारीला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
जामखेड परिसरात एकच खळबळ
जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील तुकाराम पांडुरंग भोरे (वय २६ ) या युवकाने बेरोजगारी कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे साकत, देवदैठण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवदैठण येथील पांडुरंग अजिनाथ भोरे यांचा मुलगा तुकाराम याने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याने डीएमएलटी केली होती. तो काही दिवस खाजगी लँब मध्ये प्रॅक्टीस करत होता.
तुकाराम भोरे बेरोजगारीला कंटाळले होते. शिकुनही नोकरी नाही यामुळे तो अनेक दिवसांपासून नैराश्याचे ग्रस्त होता. आणी यातच आज सकाळी शेतात जातो म्हणून गेला व शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
सकाळी गोकुळ भोरे हे गुरे चारण्यासाठी जात असताना गळफास घेतलेला दिसला ताबडतोब त्यांने पोलीस पाटील प्रशांत भोरे यांना कळवले पोलीस पाटील यांनी लगेच खर्डा पोलीसांना कळवीले
मृतदेह ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता.
तुकाराम भोरे यांच्या मागे आई – वडील, पत्नी, भाऊ, आजी असा परिवार आहे.