जामखेड न्युज——
युवा संघर्ष यात्रेत साकत परिसरातील शेतकरी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – हनुमंत पाटील
सुशिक्षीत बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती, युवा वर्गाचे अनेक प्रश्न, त्यांच्या समस्या, बेरोजगारी, युवा धोरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतरही प्रश्नांसाठी आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढलेली आहे. उद्या साकत परिसरात येत आहे तेव्हा या यात्रेत शेतकरी, युवा यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच हनुमंत पाटील व संजय वराट यांनी केले आहे.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून साकत परिसरातील नागरिकांना सोलर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंपासाठी लाईट मिळत आहे. मोठा फायदा झाला आहे. आमदार साहेबांचे ऋण फेडण्यासाठी एक दिवस काम बंद ठेवून शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या सकाळी दहा वाजता पिंपळवाडी, कोल्हेवाडी फाटा येथे आगमन तसेच ढोल तासाच्या गजरात स्वागत करण्यात येणार आहे तेव्हा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच दुपारी साकत येथे स्नेहभोजन, दुपारी २.३० वाजता भव्य मिरवणूक विद्यार्थी, भजनी मंडळ, गोंधळी, हलगी बँन्जो मिरवणूक होत आहे. यानंतर ५.३० वाजता पाटोदा कडे प्रस्तान होईल तेव्हा मोठ्या संख्येने शेतकरी व युवकांनी सहभागी व्हावे.
पुण्यातील तुळापूर येथून सुरू झालेली तुळापूर ते नागपूर ही युवा वर्गाच्या अनेक प्रश्नांची उकल करणारी व राज्य सरकारकडे या प्रश्नांची मांडणी करणारी युवा संघर्ष यात्रा मध्यंतरी 28 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर थांबवली होती. ती यात्रा आज जामखेड तालुक्यातील चौंडी येथून सुरू होणार आहे.
चौंडी हळगाव येथून युवा संघर्ष पदयात्रेच्या पुढील टप्प्याला सुरुवात झाली असून संध्याकाळी मार्केट यार्ड जामखेड मुक्काम सकाळी जामखेड वरून साकतला येत आहे तेव्हा आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यासाठी एक दिवस काढावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आजच देवदैठण येथील युवकांने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे बेरोजगारी वर सरकाचे लक्ष वेधण्यासाठी युवा संघर्ष यात्रा आहे. यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रा सुरू असून ती 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे पोहोचणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मध्ये पोचणाऱ्या यात्रेमध्ये युवा वर्गाचे अनेक प्रश्न, त्यांच्या समस्या, बेरोजगारी, युवा धोरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतरही प्रश्नांची मांडणी करण्यात आली आहे.
ही युवा संघर्ष यात्रा आज चौंडी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान चौंडी येथून यात्रेची सुरुवात झाली ही यात्रा पुढील 25 दिवसात नागपूर येथे पोहोचणार आहे.