चौंडीच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी आमदार रोहित पवार यांनीच आणला – अक्षय शिंदे

0
295

जामखेड न्युज——

चौंडीच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी आमदार रोहित पवार यांनीच आणला – अक्षय शिंदे

कर्जत जामखेड मतदारसंघाचा मागील अनुशेष भरून काढण्यासाठी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाची ओळख संपूर्ण देशात आदर्श गाव म्हणून व्हावी यासाठी सर्वात जास्त निधी आमदार रोहित पवार यांनी आणला कोणी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी विकास कामांसाठी सर्वात जास्त निधी आणण्यात ते प्रथम स्थानी राहिले असे मत अक्षय शिंदे यांनी विविध मान्यवरांच्या हस्ते विकास कामांचे भूमीपूजन करताना सांगितले.


पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी ता. जामखेड येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या विविध कोट्यवधींच्या विकासकामांचे दि.16 नोव्हेंबर (गुरुवार) रोजी संध्याकाळी भूमीपूजन संपन्न झाले यावेळी संसदरत्न खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीम. सुप्रिया सुळे, माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख, काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजीत कदम, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, सक्क्षणा सलगर यांच्या सह

प्रा. मधुकर राळेभात, दत्ता वारे, सुरेश भोसले, राजेंद्र पवार, राजेंद्र कोठारी, विजयसिंह गोलेकर, अक्षय शिंदे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, संचालक सुधीर राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, संजय वराट, सरपंच हनुमंत पाटील, बापुसाहेब कार्ले, विकास राळेभात, दिपक पाटील, प्रदिप दळवी, किसनराव दळवी, भीमराव लेंडे, निखिल घायतडक, सरपंच सुनील उबाळे, सचिन हजारे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रस्तावित करताना अक्षय शिंदे म्हणाले की, कर्जत जामखेड मतदारसंघासाठी आमदार रोहित पवार मिळाले हे आपले भाग्य आहे. तसेच युवा संघर्ष यात्रेतून सरकारला जागे करण्याचे काम आमदार करत आहेत.


आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी 2 कोटी तीन लाख व सीना नदीवरील पश्चिम घाट बांधकामासाठी 4 कोटी 99 लाख निधी मंजूर करण्यात आला होता व

आता संग्रहालय बांधकामासाठी तीन कोटी रुपये, नदीकाठी घाटाचे बांधकाम व सुशोभिकरण 2.5 कोटी रुपये व दोन भव्य मोठ्या कमानी बांधकाम 1.5 कोटी रुपये असा सात कोटी रुपये असे एकूण 14 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चौंडी येथे संपन्न होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here