जामखेड न्युज——
साकतमध्ये श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज
पुण्यतिथी सप्ताहाध्ये परीसरातील गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त साकतमध्ये भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सोमवार दिनांक ३० पासून सुरूवात झाली आज शुक्रवार दि. ०३ रोजी ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक नेवासा यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले. किर्तनानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

या सप्ताह मध्ये हभप उत्तम महाराज यांच्या संकल्पनेतून परिसरातील शिक्षण, उद्योग, कृषी, वैद्यकीय, स्पर्धा परीक्षा, खेळ यात नावलौकिक मिळवलेल्या गुणवंतांचा सन्मान सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आला

शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान
१) अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने
दत्ता काळे मुख्याध्यापक श्री साकेश्वर विद्यालय साकत यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल सप्ताहक मिटीच्या वतीने करण्यात येत आहे.
२) आदर्श शिक्षक विश्वगामी पत्रकार संघ सोलापूर तर्फे राजकुमार थोरवे यांना आदर्श शिक्षक मिळाल्याबद्दल
स्पर्धा परीक्षा
३) श्रीकृष्ण हनुमंत वराट गावातील पहिला अधिकारी होण्याचा मान एमपीएससी मार्फत सहाय्यक विक्रीकर अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल
वैद्यकीय क्षेत्रातील गुणवंत व तज्ञ डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले
४) डॉ. विवेक मुरूमकर – प्रसिद्ध मेंदू तज्ञ पुणे
भारतातील तज्ञ डॉक्टर मध्ये समावेश असल्याबद्दल
५) डॉ. महारुद्र सानप वैद्यकीय अधिकारी कणकवली
एमबीबीएस साठी शिक्षण घेत असलेले गुणवंत विद्यार्थी
६) डॉ. सुमित अजय वराट – लातूर
७) डॉ. अथर्व सुनिल वराट – लातूर
८) डॉ. श्रेयस अरूण वराट – कोल्हापूर
९) डॉ. आदित्य गणेश अडसूळ
१०) डॉ. भाग्येश युवराज मुरूमकर – विखे पाटील मेडिकल कॉलेज नगर
११ )डॉ. धनश्री जालिंदर वराट बीडीएस जामखेड
१२)प्रा. अरूण वराट सर
ग्रामीण भागात कै. देवराव दिगंबर वराट काॅलेज आँफ फार्मसी काॅलेज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल
१३) कैलास वराट सर
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल
आदर्श शेतकरी
१४) अविन लहाने आधुनिक पद्धतीने फळबाग तसेच नर्सरी क्षेत्रात मोठे योगदान परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती करत आहेत.
१५) अरविंद वराट
आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड
आदर्श उद्योजक
१६)शहादेव वराट
राज्यस्थान ग्रेनाइट अँड मार्बल उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. याबद्दल
विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी
१७) दहावी परिक्षेत गावात प्रथम क्रमांक
राधिका रामभाऊ वराट
बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक
१८)तनवी किशोर मुरूमकर
निकिता दिनकर घोलप
बारावी काँमर्स जिल्ह्यात दुसरा क्रमांक
१९) अर्जुन रासकर सर यांची कन्या सिद्धी रासकर थाळीफेक मध्ये राज्यस्तरीय सुवर्ण पदक
२०)श्रेयस सुदाम वराट
राज्यस्तरीय सँम्बो कराटे स्पर्धेत सुवर्णपदक
तसेच शालेय वुशू स्पर्धेत पुणे विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक
२१)वराट यशराज शहादेव
पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती धारक
२२)वराट यशांजली शहादेव
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक
तसेच सारथी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक
२३)मुरूमकर सार्थक रमेश
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हस्ताक्षर स्पर्धेत सात ते नऊ गटात प्रथम क्रमांक
२४)ऋतुजा श्रीकांत वराट
एनएमएमएस सारथी मध्ये निवड
२५) घोलप हर्षदा शिवनाथ
एनएमएमएस सारथी मध्ये निवड
यांचा सन्मान सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आला.

कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी हभप उत्तम महाराज वराट, हभप हरीभाऊ काळे,
हभप बिभीषण महाराज कोकाटे, हभप माऊली महाराज कोल्हे, अशोक सपकाळ महाराज, दिनकर महाराज मुरूमकर, उतरेश्वर महाराज वराट, पांडुरंग अडसूळ, मनोज महाराज राजगुरू, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, युवराज मुरूमकर, पोलीस पाटील महादेव वराट, अर्जुन रासकर, सचिन वराट, महादेव वराट, नारायण मुरूमकर साहेब, यांच्या सह अनेक मान्यवर तसेच जामखेड भजनी मंडळ, तसेच पारगाव, साकत, ढाळेवाडी, अनपटवाडी, धामणगाव, देवदैठण, पिंपळवाडी, भजनी मंडळ यांच्या सह फोटो ग्राफर शिवशंभो फोटो अतुल दळवी तसेच मोठ्या प्रमाणावर श्रोते हजर होते.
साकतमध्ये श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४१ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

रोज सायंकाळी सात ते नऊ महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची किर्तन सेवा होणार आहे.
शुक्रवार दि. ०३ रोजी ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक नेवासा किर्तन झाले यानंतर गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
शनिवार दि. ०४ रोजी ह. भप न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे
तसेच रविवार ०५ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन
रविवार दि. ०५ रोजी ह.भ.प. सुनील महाराज झांबरे आष्टी सायंकाळी ०७ ते ०९
तसेच सोमवारदि ०६ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल.
या किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ आहेत.
गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव चव्हाण, अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे सहभागी आहेत
भजन कीर्तन व्यवस्थापक दिनकर मुरूमकर, श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे आहेत. तसेच गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर असतात.
सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट यांच्या सह संपूर्ण गावकरी नियोजन करत आहेत.





