जामखेड मराठी साहित्य प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर.

0
337

जामखेड न्युज——

जामखेड मराठी साहित्य प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर.

 

जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे सन 2022 चे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध लेखक प्रा.आ.य.पवार व संस्थेचे सचिव प्रा. डॉ. शत्रुघ्न कदम यांनी दिली आहे.


काव्यसंग्रह,कथा,कादंबरी, लेखसंग्रह, साहित्य संशोधनाचे ग्रंथ पुरस्कार, छत्रपती राजे संभाजी साहित्य पुरस्कार आणि समीक्षा,चरित्र यासाठी महात्मा फुले साहित्य पुरस्कार या नावाने पुरस्कार दिले जात असून रोख रक्कम,मानचिन्ह,गौरव पत्र,शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंबर मध्ये पुरस्काराचे वितरण होईल अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात व खजिनदार डॉ.जतीनबोस काजळे यांनी दिली.

पुरस्कार याप्रमाणे:कथा-(गोरवेणा)डॉ.विजय जाधव,वाशिम.कादंबरी-(राशाटेक)डॉ.प्रतिमा इंगोले,अमरावती.समीक्षा-(मध्ययुगीन दलित संत कविता : सामाजिक व वाड्;मयीन मूल्यमापन)डॉ.संदीप सांगळे,पुणे.कविता-(नाही गिरवता येत कुठलीच लिपी)डॉ.स्मिता पाटील,सोलापूर,(हुंकारनाद)अनुराधा नेरूरकर,मुंबई. शोधनिबंध संपादन-(आ.य.पवार यांच्या निसर्ग व विज्ञान कविता राष्ट्रीय चर्चा सत्र )डॉ.जयदेवी पवार,लातूर.ललित लेख-(कवडसे)प्रा.चिन्मय घैसास,गोवा, (स्त्रीशक्ती) डॉ.भि.ना.दहातोंडे,नगर, चरित्र.-(भाई गणपतराव देशमुख)डॉ.किसन माने,सांगोला. गझलसंग्रह -(तुकोबाच्या कुळाचा वंश ) संतोष कांबळे, नाशिक.


पुरस्कार निवड समितीत डॉ.राजाराम सोनटक्के,डॉ.सुभाष देशमुख,डॉ.गोपीनाथ बोडके,प्रा.विजया नलवडे यांनी काम पाहिले. अहमदनगर,बीड,उस्मानाबाद,सोलापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्र असलेल्या मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड या संस्थेमार्फत कवी संमेलन, व्याख्याने, ग्रामीण साहित्य संमेलन,राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार व मराठी भाषेसाठी विशेष कार्य केले जाते.ग्रंथ पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here