जामखेड न्युज——
ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडून जवळा गावची संस्कृती जपा – राजेंद्र राऊत
शेतकरी ग्रामविकास आघाडीचे आवाहन
जवळा ही जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची ग्रामपंचायत यासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे जवळेश्वाराच्या पावन भुमित धार्मिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रम खेळी मळीच्या वातावरणात पार पडत आसतात आणि उद्याची निवडणूक ही तशाच वातावरण पार पाडुन आपल्या गावाचा इतिहासाची उज्जवल परंपरा राखुया असे आवाहन शेतकरी ग्रामविकास आघाडी पॅनेलचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की मतदानाचा हक्क सविधांने आपल्याला दिलेला अनमोल हक्क आहे. आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही बळकट करू असे आवाहन केले.
गावाची शांतता अबाधित राखणे ही आपल्या सर्व जवळा वासियांची जबाबदारी आहे कोणताही आनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहेच त्यांनाही सहकार्य करू अशी विनंती त्यांनी जवळेकरांना जामखेड न्युजच्या माध्यमातून केली आहे.