जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट ) –
ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.विद्यालयाने विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ऑनलाइन योगाचे आयोजन केले होते. उपस्थितांसाठी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये योग दिन हा पालक-विद्यार्थी ग्रामस्थ यांच्यासाठी सकाळच्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या वेळी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवजी देशमुख, यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना कोरोनामुळे योगासाठी सर्वांना बोलवता आले नाही खंत व्यक्त केली. ही महामारी लवकरच संपुष्टात येऊन पुढील वर्षी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक मिळून योगा करू व या कोरोना वर सर्व नियमांचे पालन करून विजय मिळवू असे प्रतिपादन केले.
यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी साऊंड माईंड, साऊंड बॉडी म्हणजेच निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्य करते उत्तम आरोग्यासाठी योगा रोज करावा.
सोशल डिस्टंसिंग पाळून योग दिन साजरा करण्यात आला. भारतीयांचा योगा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संकल्प करूया सर्वजण स्वतःच्या आरोग्यासाठी रोज योगा करूया हे स्पष्ट करताना ल.ना.होशिंग विद्यालयाचे व योग शिक्षक बाळासाहेब पारखे यांचे मनापासून अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
जामखेड पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व सर्व पोलिस बांधव उपस्थित होते.या वेळी शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे व सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.त्याच बरोबर राजेंद्र देशपांडे हेही उपस्थित होते.
ज्यांनी अतिशय सुंदर योग दिनाचे नियोजन केले असे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, कार्यक्रमाच्या नियोजनासाठी योगशिक्षक बाळासाहेब पारखे, समारंभ प्रमुख संजय कदम, अनिल देडे, मुकुंद राऊत, शिक्षक प्रतिनिधी राघवेंद्र धनलगडे, प्रा. सादिक शेख, नीलेश भोसले,अविनाश नवगिरे, संजय जाधव, संजय सरडे, बारवकर , अनिल काळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.