नागेश विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  ऑनलाइन मार्गदर्शन

0
262
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये जागतिक योग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे  यांच्या आदेशानुसार एनसीसी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला अशी माहिती प्राचार्य मडके बी के यांनी दिली.
   या वेळी पाचवी ते दहावी वर्गाच्या गटानुसार शिक्षकांच्या मार्फत मदतीने योग-व्यायामाचे मार्गदर्शन करण्यात आले.
 तसेच शिक्षक व विद्यार्थी एनसीसी छात्र यांना  योगाचार्य जितेंद्र बोरा यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती ए.पी.आय सुनील बडे, पी.एस.आय राजू थोरात व जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस सहभागी होते .
     विद्यालयाचे स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, रा.कॉ.महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,
प्राचार्य श्री बी.के.मडके , गुरुकुल प्रमुख श्री संतोष ससाने, एनसीसी विभाग प्रमुख मयुर भोसले व सर्व शिक्षक,एनसीसी युनिट व ५२० विद्यार्थी  ऑनलाइन प्रशिक्षणासाठी सहभागी होते.
     या प्रशिक्षणामध्ये योग, प्राणायाम ,व्यायाम ,सूर्यनमस्कार  श्वसनाचे व्यायाम,कोविड संदर्भात  घ्यायची काळजी  यावर सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करण्यात आले. ए.पी.आय सुनील बडे यांनी योग व्यायाम नियमित करा व योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
      प्राचार्य मडके बी के यांनी सर्वांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here