सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथीनिमित्त ह. भ. प. दयानंद महाराज कोरेगांवकर यांचे साकतमध्ये सुश्राव्य असे किर्तन

0
218

जामखेड न्युज——

सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथीनिमित्त ह. भ. प. दयानंद महाराज कोरेगांवकर यांचे साकतमध्ये सुश्राव्य असे किर्तन

 

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त साकतमध्ये भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सोमवार दिनांक ३० पासून सुरूवात झाली आज दि. २ रोजी ह. भ. प. दयानंद महाराज कोरेगांवकर यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले.

त्यांनी किर्तन सेवेसाठी पुढील अभंग निवडला होता.

ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥१॥
देव तया जवळी असे । पाप नासे दर्शणें ॥ध्रु.॥
कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥२॥
तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडोनि ॥३॥

अर्थ

या जगामधे सर्वत्र देवच आहे असा ज्याचा दृढनिश्चय असतो. देव त्याच्याजवळ राहात असतो व त्याच्या दर्शनाने पाप नाहीसे होते. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचा क्राम क्रोध वास्तव्य वास करत नाही व त्याच्या अंत:करणामध्ये सर्वत्र देव आहे सर्व भूतमात्रांविषयी समान भावना प्राप्त झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा या ब्रम्हरुप झालेल्या माणसांच्या मनामधून भेदाभेद व वादविवाद खंडीत झालेले असतात.

 

कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी हभप उत्तम महाराज वराट, हभप हरीभाऊ काळे,
हभप बिभीषण महाराज कोकाटे, हभप माऊली महाराज कोल्हे, अशोक सपकाळ महाराज, दिनकर महाराज मुरूमकर, उतरेश्वर महाराज वराट, पांडुरंग अडसूळ, मनोज महाराज राजगुरू जामखेड भजनी मंडळ, तसेच पारगाव, साकत, ढाळेवाडी, अनपटवाडी, धामणगाव, देवदैठण, पिंपळवाडी, भजनी मंडळ यांच्या सह फोटो ग्राफर शिवशंभो फोटो अतुल दळवी तसेच मोठ्या प्रमाणावर श्रोते हजर होते.

साकतमध्ये श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४१ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

रोज सायंकाळी सात ते नऊ महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची किर्तन सेवा होणार आहे.

आज गुरूवार दि. ०२ रोजी ह. भ. प. दयानंद महाराज कोरेगांवकर

शुक्रवार दि. ०३ रोजी ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक नेवासा

शनिवार दि. ०४ रोजी ह. भप न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे

 

तसेच रविवार ०५ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन

रविवार दि. ०५ रोजी ह.भ.प. सुनील महाराज झांबरे आष्टी सायंकाळी ०७ ते ०९

तसेच सोमवारदि ०६ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल.

या किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ आहेत.

गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव चव्हाण, अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे सहभागी आहेत

भजन कीर्तन व्यवस्थापक दिनकर मुरूमकर, श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे आहेत. तसेच गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर असतात.

सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट यांच्या सह संपूर्ण गावकरी नियोजन करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here