एकाच घरात भावाचा दाखला मराठा तर बहिण कुणबी, जामखेड तालुक्यातील नोंदी

0
3489

जामखेड न्युज——

एकाच घरात भावाचा दाखला मराठा तर बहिण कुणबी, जामखेड तालुक्यातील नोंदी

जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी एकाच घरात भाऊ व बहिण यांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी आढळून आली आहे. यात बहिणीची कुणबी तर भावाची मराठा नोंद आहे. यामुळे मराठा म्हणजे कुणबी असल्याचाच हा पुरावा आहे. शासनाने मराठा समाजाला कुणबी आरक्षण ताबडतोब द्यावे अशी मागणी होत आहे.


मराठा आरक्षणावरून राज्य पेटलेले असताना राज्य सरकारकडून आज मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मात्र मराठा आणि कुणबींमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे उघड होत आहे. जामखेड तालुक्यात मोरे कुटुंबात बहिण कुणबी तर भाऊ मराठा अशी नोंद शाळेच्या दाखवल्यावर आहे.


चंद्रभागा भाऊ मोरे हिंदू कुणबी तर दिगंबर भाऊ मोरे हिंदू मराठा अशी शाळेच्या दाखवल्यावर नोंद आहे. यामुळे मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे याला पाठिंबा म्हणून जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरु आहे. यातच एक दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. तालुक्यातील रणरागिणीही मैदानात उतरल्या होत्या त्यांनी एक दिवस उपोषण केले होते. तसेच एका दिवशी भव्य दिव्य कँडल मोर्चा काढला होता. आज दि. २ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या महिला आघाडीच्या वतीने खर्डा चौकात तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.


सख्खे भाऊ बहिण असुनही दाखवल्यावर वेगवेगळी नोंद आहे. अजूनही अनेक जणांची अशीच नोंद निघत आहे. राज्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. काहींच्या नोंदी कुणबी तर नंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहेत. मात्र जामखेड तालुक्या अनेक ठिकाणी एकाच घरात वेगवेगळ्या नोंदी आहेत.

तसेच राज्यात पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्रे व्हायरल झाल्याने प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

जामखेड तालुक्यातील साकत गावात १९२० पर्यंत अनेक दाखल्यांवर कुणबी नोंद आहेत १९२० नंतर मात्र मराठा नोंद लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here