जामखेड न्युज——
सरासरी पेक्षा कमी पाऊस असतानाही नगर जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळी यादीत नाही
सरासरी पेक्षा कमी पाऊस असतानाही नगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश नसल्याने महसूल विभागाविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. तीव्र दुष्काळी परिस्थिती असताना नगर जिल्हा वगळता गेला आहे त्यामुळे दुष्काळी सवलतीला शेतकरी मुकणार आहेत.
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांची नावे पुढील
प्रमाणे
नंदूरबार (जिल्हा नंदूरबार), सिंदखेड (धुळे), चाळीसगाव (जळगाव), बुलढाणा, लोणार (बुलढाणा), भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा (जालना), छत्रपती संभाजीनगर, सोयगाव (छत्रपती संभाजीनगर), मालेगाव, सिन्नर, येवला (नाशिक), पुरंदर सासवड, बारामती, शिरुर, दौंड, इंदापूर (पुणे), वडवनी, धारुर, अंबेजोगाई (बीड), रेणापूर (लातूर), वाशी, धाराशिव, लोहारा (धाराशिव), बार्शी,माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा (सोलापूर), वाई, खंडाळा(सातारा), हातकणंगले, गडहिंग्लज (कोल्हापूर), शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज (सोलापूर)
जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत 73.7 टक्केच पाऊस झालेला असून आतापासून अनेक ठिकाणी शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहेत. विशेष करून उत्तर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर आणि नेवासा तालुक्यात सरासरीच्या 22 ते 55 टक्के पावसात घट आहे. राज्य सरकारच्यावतीने मंगळवारी राज्यातील दुष्काळी तालुक्यातून नगर जिल्ह्यातील कमी पाऊस असणारी तालुके वगळ्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारच्या निर्णयामुळे कमी पाऊस असणार्या भागातील शेतकर्यांसह नागरिक शासनाच्या विविध सवलतींना मुकणार आहे.
यामुळे कमी पाऊस झालेल्या तालुक्यांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. यंदा जिल्ह्यात सुरूवापासून पावसाचा मोठा खंड पाहावयास मिळाला. जून महिन्यांत जेमतेम पाऊस झाला. जुलैनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पावसाचा मोठा खंड होता. सप्टेंबर महिन्यांचा शेवटचा कालावधीत जिल्ह्यात टप्प्याने सर्वदूर पावसाची नोंद झाली. विशेष नगर शहर आणि तालुक्यातील काही भागात आणि पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी कमी कालावधीत जादा पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, पावसाचा हा कालावधी कमी होता. त्यानंतर जिल्ह्यातून पाऊस गायब झाला.
जिल्ह्यात प्रशासनाकडील आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 73.7 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची सरासरी ही 448 मिली मीटरची असून जिल्ह्यात यंदा 417 मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्याच्या एकूण पावसाच्या सरासरीत जवळपास 26 टक्क्यांची घट आहे. ही घट काही तालुक्यात 55 टक्क्यांपर्यंत आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात विहीरीच्या पाण्याची शाश्वती कमी असून पाटपाणी असणार्या भाग वगळता अन्य ठिकाणी पिकांसोबत चार्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी ऐन ऑक्टोबर महिन्यांत विहीरीतील पाणी कमी होतांना दिसत असून डिसेंबर-जानेवारीपासून टंचाईच्या झळा वाढणार आहेत.
कमी पाऊस असणारे तालुके
श्रीरामपूर 45 टक्के, राहुरी 57 टक्के, राहाता 66 टक्के, कोपरगाव 69 टक्के, संगमनेर 76 टक्के आणि नेवासा 78 टक्के असा आहे.
सरासरी ते जवळपास असणारे तालुके
पारनेर 106 टक्के, नगर 100 टक्के, श्रीगोंदा 98 टक्के, अकोले 94 टक्के, पाथर्डी 93 टक्के आणि शेवगाव 91 टक्के यासह कर्जत 85 टक्के आणि जामखेड 85.4 टक्के सरासरीच्या तुलनेत पाऊस झालेला आहे.