जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी एकुण 1302 उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उद्या छाननी तर चार जानेवारी रोजी माघार व चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतरच लढती स्पष्ट होतील.
तालुक्यातील आदर्श गाव सारोळा, आपटी, पोतेवाडी, खुरदैठण व वाकी या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर राहिलेल्या 44 ग्रामपंचायती मध्ये निवडणूकीचा सामना रंगणार आहे तरीही छाननी व माघार घेण्याच्या दिवशी आणखी काही ग्रामपंचायती बिनविरोध होऊ शकतात त्यामुळे खरे चित्र चार जानेवारी रोजी स्पष्ट होईल.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 49 ग्रामपंचायतींसाठी एकुण 1302 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दि. 23 रोजी शुन्य, दि. 24 रोजी 10, दि. 28 रोजी 127, दि. 29 रोजी 446 तर दि. 30 रोजी 719 असे एकुण 1302 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज पोतेवाडी 07, आपटी 07, सारोळा 09, वाकी 09, खुरदैठण 07 तर पुढील ग्रामपंचायती व दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे चोभेवाडी 18, धोंडपारगाव 14, राजेवाडी 10, गुरेवाडी 14, वाघा 20, पिंपळगाव उंडा 15, पिंपळगाव आळवा 24, आनंदवाडी 16, बाळगव्हाण 14, लोणी 21, नायगाव 23, बांधखडक 24, पाडळी 22, कुसडगाव 28, झिक्री 15, चौंडी 42, आघी 18, डोणगाव 20, कवडगाव 30, खांडवी 25, बावी 17, तरडगाव 17, सातेफळ 14, सोनेगाव 17, जवळके 21, घोडेगाव 21, बोर्ले 24, नाहुली 27, देवदैठण 33, मोहा 45, साकत 49, पाटोदा 50, अरणगाव 52, पिंपरखेड 57, दिघोळ 40, जायभायवाडी 30, खर्डा 101, नान्नज 45, तेलंगशी 28, धामणगाव 31, सावरगाव 14, धानोरा 36, जातेगाव 33, मोहरी 18 अशा प्रकारे 49 ग्रामपंचायतींसाठी एकुण 1302 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी उद्या दि 31 रोजी छाननीत किती अर्ज अवैध होतात व दि 4 जानेवारी पर्यंत किती अर्ज मागे घेतले जातात यानंतर खरी निवडणूक रंगत येणार आहे.