शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन विद्यार्थ्यांना बसचे पास मिळावेत व बस सुरू कराव्यात – विठ्ठलआण्णा राऊत

0
665

जामखेड प्रतिनिधी

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. नववीच्या पुढील सर्व वर्ग सुरू झालेले आहेत. पण शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी बस सुरू नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. ताबडतोब बस सुरु करून विद्यार्थ्यांना बसचे पास मिळावेत म्हणून नागेश विद्यालयाच्या स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य विठ्ठल राऊत यांनी आगार प्रमुख जामखेड यांच्या कडे केली आहे.
     जामखेड शहरातील ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,  श्री नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कन्या विद्यालय जामखेड तसेच अन्य शाळा व महाविद्यालयात परिसरातील साकत, सौताडा, नान्नज, जवळा, झिक्री, पाडळी, राजुरी, खर्डा, पाटोदा, अरणगाव, रत्नापूर, बावी, चिंचपूर तसेच अन्य ठिकाणाहून ग्रामीण भागातील मुले शाळेत ये जा करतात तसेच ग्रामीण भागातील शाळा सुरू झालेल्या आहेत पण बस सुरू नाहीत यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. तेव्हा ग्रामीण भागातील लवकरात लवकर एसटीचे पास मिळावेत व बस सुरू कराव्यात अशी मागणी नागेश विद्यालयाच्या स्कूल कमिटीच सदस्य विविठ्ठ आण्ण राऊत यांनी केकेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here