जामखेड न्युज——
मराठा आरक्षणासाठी नीरा नदीत जलसमाधी आंदोलन
मराठा आरक्षण लागू करण्यासाठी आज कळाशी, गंगावळण भागातील वीस ते बावीस आंदोलकांनी आज (दि.१) तब्बल दोन तास भीमानदीत जलसमाधी घेतल्याने पोलीस व प्रशासकीय यंत्रणेतील अधिका-यांचे तोंडचे पाणी पळाले.
‘एक मराठा लाख मराठा’ ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ यासह सरकारच्या विरोधात घोषणा देत भीमा नदीच्या पाण्यात काठापासून दोन सव्वादोन किलोमीटर अंतरावर जावून आंदोलकांनी जलसमादी आंदोलन सुरु केले होते.
एका आंदोलकाची दमछाक झाल्यानंतर त्याने पाण्यात गटांगळ्या खाल्ल्या. त्याला पुढील उपचारासाठी तातडीने बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आले.
प्रथमोपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर झाली. आंदोलनाच्या समन्वयकांशी चर्चा केल्यानंतर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीनंतर आंदोलक पाण्याबाहेर आले. उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन मराठा समाजास तात्काळ आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी या जलसमाधी आंदोलनप्रसंगी मराठा आंदोलनकर्त्यांनी केली. नीरा नदी पात्राचा परिसर मराठा युवकांनी दिलेल्या आरक्षणाच्या घोषणांनी दुमदुमून गेला. या आंदोलनामुळे नीरा नदीला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते.