जामखेड न्युज——
सरपंच पदाच्या उमेदवार पुनम संजय कांबळे यांनी दिला बाळासाहेब आव्हाड यांना जाहीर पाठिंबा
शेतकरी ग्रामविकास आघाडीचे पारडे जड
जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभ्या राहिलेल्या उमेदवार पुनम संजय कांबळे यांनी शेतकरी ग्रामविकास आघाडीचे आधिकृत उमेदवार बाळासाहेब आव्हाड यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे बाळासाहेब आव्हाड यांचे पारडे जड झाले आहे.
जवळा ग्रामपंचायत निवडणूकीत पुनम संजय कांबळे यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी या निवडणुकीतून स्वखुशीने माघार घेत शेतकरी ग्रामविकास आघाडी चे उमेदवार बाळासाहेब आव्हाड यांना सरपंच पदासाठी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी जामखेड न्युजशी बोलताना पुनम कांबळे म्हणाल्या की, माझे हितचिंतक व माझ्या मतदारांनी आता माझ्या ऐवजी बाळासाहेब आव्हाड यांना मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन जवळा ग्रामस्थांना केले.
मी कोणाच्याही दबावाला बळी पडलेले नसून मी स्वखुशीने पाठिंबा दिलेला आहे. असे त्यांनी पाठिंबा पत्रात म्हटले आहे.
सध्या जवळा ग्रामपंचायत निवडणूकीत शेतकरी ग्रामविकास आघाडीला मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. यातच पुनम कांबळे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने हि निवडणूक शेतकरी ग्रामविकास आघाडी एकतर्फी जिंकेल असे चिन्ह निर्माण झाले आहे.
जवळा गावाच्या जडणघडणीत कै. श्रीरंग कोल्हे, किसनराव दळवी, प्रदीप आबा पाटील यांनी दिलेले मोठे योगदान ग्रामस्थांच्या मनामध्ये कायम आहे. त्याचप्रमाणे त्यांचे वारसदार जवळा गावातील सर्व समाजाशी सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत आणि त्यांनीच शेतकरी ग्रामविकास आघाडीची स्थापना केली आहे. यामुळे शेतकरी ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.