जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील रणरागिणींचा आज कॅन्डल मार्च
मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थित रहावे मराठा क्रांती मोर्चा
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा महिला विभाग आता रणांगणात उतरला आहे. काल दिवसभर उपोषण केले आणी आज सायंकाळी जामखेड शहरात कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे तरी जामखेड शहरातील व तालुक्यातील महिला भगिनींनी आपल्या भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी या कॅण्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे सर्व महिलांनी सायंकाळी ६.३० वाजता तहसील कार्यालयासमोर उपस्थित रहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या महिला विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महिला विभागाच्या वतीने आज सोमवार दिनांक 30 /10 /2023 रोजी सायंकाळी ठीक . 6.30. वाजता कॅन्डल मार्च होणार आहे.तरी जामखेड शहरातील व तालुक्यातील महिला भगिनींनी आपल्या भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी या कॅण्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती. मराठा क्रांती मोर्चाच्या महिला विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तरी सर्व महिलांनी सायंकाळी सहा वाजता तहसिल कार्यालयासमोर जामखेड येथे उपस्थित रहावे असे मराठा क्रांती मोर्चाच्या महिला विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात गेल्या आहे सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे.
आज जामखेडमध्ये रणरागिणी मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. आज कँन्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे.
शिर्डीतील पंतप्रधान मोदींच्या सभेकडे तालुक्यातील गावकऱ्यांनी पाठ फिरवली होती गाड्या रिकाम्या परत लावल्या होत्या आणि आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ५८ ग्रामपंचायती पैकी ४५ ग्रामपंचायत हद्दीत सध्या राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी बोर्ड लागले आहेत. उर्वरित ग्रामपंचायत मध्ये दोन दिवसात लागतील म्हणजे जामखेड तालुक्यात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी असेल. आता तर महिलांनीही मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे आत सर्व महिला कँन्डल मार्च काढणार आहेत व शासनाला विनंती करणार आहेत. महिलांनी सायंकाळी ६.३० वाजता तहसील कार्यालयासमोर उपस्थित रहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या महिला विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.