विश्वासघात करणाऱ्यांना मतदार माफ करणार नाहीत – चेअरमन आजीनाथ हजारे शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभासाठी ग्रामस्थांनी उपस्थित रहावे

0
208

जामखेड न्युज——

विश्वासघात करणाऱ्यांना मतदार माफ करणार नाहीत – चेअरमन आजीनाथ हजारे

शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभासाठी ग्रामस्थांनी उपस्थित रहावे

 

 

मागील पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही सर्वानी एकत्र येऊन एक सुशिक्षित उमेदवार म्हणून विश्वासाने ज्यांना सरपंच पदी बसवले त्यांनी पाच वर्षांत गावचा विकास न करता स्वत: ठेकेदारी करत स्वतः चा विकास केला मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांना मतदार कदापी माफ करणार नाहीत
असे मत जामखेड न्युजशी बोलताना चेअरमन आजीनाथ हजारे यांनी व्यक्त केले.

सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रित करून जवळा गावच्या विकासासाठी कै. श्रीरंग कोल्हे, किसनराव दळवी, प्रदीप आबा पाटील यांचे मोठे योगदान आहे.
यांच्याच विचारांच्या प्रेरणेने त्यांच्या वारसदारांना बरोबर घेत समाजाशी सामाजिक बांधिलकी जपत विकासाचे स्वप्न घेऊन शेतकरी ग्रामविकास आघाडी स्थापन केली आहे.

शेतकरी ग्रामविकास आघाडी मार्गदर्शक म्हणून
दत्तात्रय कोल्हे, प्रदिप दळवी, राजू महाजन,
आर. डी. पवार, आजीनाथ हजारे, डॉ. पवार, दिपक पाटील, राजू राऊत, शहाजी पाटील पवार,
राजू मोटे, पांडुरंग वाळके, दयानंद कथले, आयुब शेख, हुसेन सय्यद, सत्तार भाऊसाहेब यांच्या सह अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ काम करत आहेत.

चौकट

शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आज सोमवार सकाळी ८.३० वा. होत आहे. जवळा फाटा ते जवळा अशी भव्य रँली काढण्यात येईल नंतर ग्रामदैवतांना नारळ वाढवून सर्वाच्या उपस्थितीत भव्य सभा होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे. असे आवाहन चेअरमन आजीनाथ हजारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here