जामखेड न्युज——
पंतप्रधान मोदींच्या सभेकडे जामखेड तालुक्यातील नागरिकांनी फिरवली पाठ
गावोगावच्या बस रिकाम्याच फिरल्या माघारी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमधील विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. या सभेसाठी जास्तीत जास्त लोक जमवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी नियोजन केले होते. प्रत्येक गावात दोन तीन बसचे नियोजन होते जामखेड तालुक्यातून शंभर बसचे नियोजन होते. पण आज गावागावातील बस रिकाम्याच माघारी फिरल्या बसमध्ये कोणीच बसले नाही.

सध्या मराठा आरक्षण मागणीने जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शासनाने दिलेली मुदत संपली म्हणून पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गावा गावात पुढाऱ्यांना बंदी आहे. साखळी उपोषण सुरू आहेत. मराठा आरक्षणावरून सध्या वातावरण तप्त आहे. यातच मोदीची आज सभा या सभेकडे जामखेड तालुक्यातील नागरिकांनी पाठ फिरवली आहे.

मोदींच्या सभेत जर पंतप्रधानांनी मराठा आरक्षणावर जर काही भाष्य केले नाही तर संभाजी ब्रिगेड व शिवसेना मोदींच्या सभेत शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणावर आपली काय भूमिका आहे. याचा जाब विचारला जाणार आहे. पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेड व शिवसेना यांनी आम्ही पंतप्रधान यांना मराठा आरक्षणाबाबत विचारणा करणारच अशी भुमिका घेतली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सतरा दिवस उपोषण केले होते. यावेळी सरकारने तीस दिवसांची मुदत मागितली होती. जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती ती चाळीस दिवसांची मुदत संपली आहे.
अद्याप आरक्षण जाहीर झाले नाही तेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे.
जामखेड तालुक्यातील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेकडे फिरवली आहे. बस रिकाम्याच माघारी फिरल्या आहेत. गावा गावात वातावरण तप्त आहे.



