जामखेड न्युज——
नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने आयोजित ओपन गरबा दांडियामध्ये सिनेतारका जामखेड करांच्या भेटीला
दर्जेदार विकास कामांसोबत मनोरंजनात्मक कार्यक्रम राबविणारे नगरसेवक म्हणून अमित चिंतामणी यांची ओळख

सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त जामखेड येथिल नगरसेवक अमित चिंतामणी यांनी महीलांसाठी शनिवार दि २८ रोजी ओपन गरबा दांडियाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी ”बाईपण भारी देवा फेम सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी- मोने व अभिनेत्री शिल्पा नवलकर उपस्थित राहून जामखेड मधील महिला भगिनींसोबत दांडियाचा आनंद घेणार आहेत.

या गरबा दांडियाचे आयोजक अमित चिंतामणी हे विविध सण उत्सवांच्या निमित्ताने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. त्या अंतर्गतच गेल्या आठ वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबवित असतात. त्यानुसारच याही वर्षी ओपण गरबा दांडीया आयोजन केले असून यामध्ये नक्षत्र मंगळागौर ग्रुप, पुणे यांचा गरबा दांडिया कार्यक्रम होणार आहे.

हा कार्यक्रम जामखेड शहरातील ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड येथे वार शनिवार दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अमित चिंतामणी व सौ.प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले आहे.

दर्जेदार विकास कामांसोबत मनोरंजनात्मक कार्यक्रम राबविणारे नगरसेवक म्हणून अमितची ओळख
जामखेड शहरातील सर्वात दर्जेदार कामे असणारा प्रभाग म्हणून अमित चिंतामणी यांचा प्रभाग तेरा ओळखला जातो. नगरसेवक म्हणून प्रभागातील नागरिकांना दिलेले आश्वासन व नागरिकांची मागणी यानुसार प्रभागातील १०० टक्के कामे पूर्ण केली आहेत. काही कामे तर पदरमोड करून पुर्ण केलेली आहेत. सिमेंट किंवा पेव्हिंग ब्लॉक असणारे रस्ते, भुमीगत गटारे अशी अनेक कामे तीही दर्जेदार असा प्रभाग तेरा आहे. विकास कामांसोबत दरवर्षी मनोरंजनात्मक विविध कार्यक्रम चिंतामणी यांच्या मार्फत राबवले जातात





