मराठा आरक्षणाबाबत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना आण्णासाहेब सावंत यांचा जाहीर प्रश्न

0
691

जामखेड न्युज ——

मराठा आरक्षणाबाबत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना आण्णासाहेब सावंत यांचा जाहीर प्रश्न

 

जामखेड येथील खासदार सुजय विखे यांच्या आढावा बैठकीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वेगवेगळी भूमिका मांडणाऱ्या भाजप पक्षाचा जाहीर निषेध केला व खासदारांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असा प्रश्न केला.

२६ रोजी शिर्डी येथे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा असून या निमित्ताने खासदार सुजय विखे यांनी जामखेड पंचायत समिती मध्ये नियोजन बैठक आयोजित केली होती. ऐन बैठक सुरु असताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब, तालुका अध्यक्ष राजू काटकर, तालुका उपाध्यक्ष सुनिल जगताप यांनी बैठकी मध्ये प्रवेश करून मराठा आरक्षण विषयावर खासदार सुजय विखे त्यांच्या पक्षाचा जाहीर निषेध केला.

तुमचं सरकार मराठा आरक्षणावर मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. वेगवेगळे मंत्री वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. तुमचे मंत्री खोटी आश्वासने देत आहेत तरी तुमचा व तुमच्या पक्षाच्या भूमिकेचा जाहीर निषेध व्यक्त करतो आशा शब्दात आण्णासाहेब सावंत यांनी खासदार महोदयांना सुनावले.


परवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे येत असून त्यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली.

रोज मराठा कुटुंबातील तरुण मराठा आरक्षणापायी आत्महत्या करत आहेत व सरकार बघ्याची भूमिका घेत आहे हे वेदनादायी आहे, दसरा तुम्हाला शुभ असेल आम्हाला नाही कारण आमच्या घरातील तरूण पोरं आत्महत्या करत आहेत. याचं तुम्हाला काही देणंघेणं नाही आशा शब्दात संताप व्यक्त केला.

जर उद्याच्या सभेत पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली नाही तर भर सभेत त्यांना जाब विचारला जाईल असाही इशारा या वेळी देण्यात आला. यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, मी मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान यांना सांगितले आहे. मराठा आरक्षण मिळावे हिच माझी भूमिका आहे. मराठा आरक्षणास माझा जाहीर पाठिंबा आहे असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here