Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गटका क्रीडा स्पर्धेत जामखेडच्या पृथ्वीराज शाम पंडित ला...

दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गटका क्रीडा स्पर्धेत जामखेडच्या पृथ्वीराज शाम पंडित ला कांस्य पदक

0
474

जामखेड न्युज——

दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गटका क्रीडा स्पर्धेत जामखेडच्या पृथ्वीराज शाम पंडित ला कांस्य पदक

 

नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गटका क्रीडा स्पर्धेमध्ये पृथ्वीराज शाम पंडित या खेळाडूने कांस्य पदक मिळविले याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पृथ्वीराज शाम पंडित हा नागेश विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत आहे. त्यांने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गटका क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


पृथ्वीराज पंडित याच्या यशाबद्दल आमदार रोहित पवार, विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात, उमेश देशमुख, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बी. के. मडके, मा. प्राचार्य श्रीराम मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती कैलास वराट, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, माजी सभापती संजय वराट सह तालुक्यातील पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

पृथ्वीराज पंडित यास अ.नगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रा. लक्ष्मण उदमले, उपाध्यक्ष शाम पंडित, रोहित थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!