जामखेड न्युज——
आईच्या निधनानंतर सहाच दिवसात मुलीचे निधन, अर्चना चंद्रकांत वराट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
साकत येथील चंद्रकांत नारायण वराट यांची पत्नी अर्चना चंद्रकांत वराट ( वय ३५ वर्षे ) यांचे आज सकाळी ६.३० वा. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले यामुळे वराट कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
अर्चना वराट यांच्या वडिलांचे वर्षापूर्वीच निधन झाले होते तर यांच्या मातोश्री मंगलबाई कोल्हे यांचे
बुधवारी ४ आँक्टोबर रोजी कोल्हेवाडी येथे वृद्धापकाळाने निधन झाले होते याच मानसिक दडपणाखाली अर्चना वराट होत्या आज सोमवारी सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अंत्यविधी साकत येथे ११.३० वाजता झाला. विविध मान्यवरांनी श्रध्दांजली अर्पण केली.
अर्चना वराट यांच्या मागे पती चंद्रकांत वराट, दोन मुले सासू असा परिवार आहे.