मनोज जरांगे पाटील या सामान्य माणसाच्या लाखोंच्या सभा, सरकारपुढे कोडे

0
561

जामखेड न्युज——

मनोज जरांगे पाटील या सामान्य माणसाच्या लाखोंच्या सभा, सरकारपुढे कोडे

 

मराठवाड्याला परिचित असणारे नाव महाराष्ट्रभर पसरले. ते नाव म्हणजे मनोज जरांने पाटील. कधीकाळी उपजिविकेसाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केले. मराठा आंदोलनासाठी त्यांनी स्वत:ची जमीन विकली. आता हे नाव राज्यातील घराघरापर्यंत गेले आहे. एका सामान्य माणसाच्या लाखोंच्या सभा सध्या महाराष्ट्रात होत आहेत. शेकडो जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण होत आहे. रात्रीच्या दोन तीन वाजेपर्यंत लोक जरांगे पाटील यांची वाट पाहत आहेत. गावोगावी जंगी स्वागत होत आहे. एका सामान्य माणसाच्या लाखोंच्या सभा हे इतिहासात प्रथमच घडत आहे. सरकारपुढे एक कोडे निर्माण झाले आहे.

मनोज जरांगे पाटील आहेत कुठले

मनोज जरांगे पाटील मुळचे बीड जिल्ह्यातील. मोतोरी हे त्यांचे गाव. काही वर्षांपूर्वी त्यांनी बीडमधून जालनाकडे आपला मुक्कम हलवला. जालना जवळ असलेल्या अंबडमधील अंकुशनगरात ते स्थायिक झाले. त्यांच्या घरची परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे उपजिविकेसाठी त्यांनी एकेकाळी हॉटेलमध्ये काम केले. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते समाजात जाऊ लागले. चर्चा करु लागले. मग मराठा आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जमीन विकली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कित्येक मोर्चे काढले. आमरण उपोषणे केली. रास्ता रोको केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले.

लाठीचार्जनंतर राज्याचे लक्ष वेधले

मनोज जरांगे पाटील यांनी सतरा दिवस उपोषण केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी होती. तीन दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही. परंतु १ सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. त्यावेळी लाठीचार्ज पोलिसांनी केला. अनेक जण जखमी झाले आणि राज्याचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले. पत्नी, चार मुले, तीन भाऊ आणि आई-वडील असे मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंब आहे.

आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांततेत आंदोलन सुरू होते, पण सरकारला काय झाले काय माहीत त्यांनी आपल्या आई-बहिणीवर हल्ला केला. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. हे आंदोलन आता पेटले, सरसकट मराठेशेतकरी आहेत, पण अर्ध्या मराठ्यांना आरक्षण, अर्ध्या मराठ्यांना आरक्षण नाही, हे बरोबर नाही. सरकारने आम्हाला एक महिन्याचा अवधी मागितला अन् म्हणाले तुम्हाला कायम टिकणारे आरक्षण देतो.

सरकारचा असा डाव होता आपण वेळ देणार नाही. पण मी त्यांचा डाव ओळखला होता. कारण मी पण मराठ्याचे पिल्लू आहे. सरकार मला तीस दिवसांचा वेळ मागत होते. आपण त्यांना चाळीस दिवस दिले. आता सरकारला वेळ पाहिजे होता तो दिला. आता सरकारने ठरलेल्या वेळेप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण न वळवळ करता द्यावे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आता मराठा कुणबी एक असूनही त्यांना आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय तुमच्या सर्वाच्या सहकार्याने आपण सरकारला सुट्टी देणार नाही. मराठा व कुणबी एकच आहेत सरकारला पाच हजार पुरावे दिले आहेत. त्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजातील दानशूर व्यक्ती मुक्त हाताने मदत करत आहेत. लोक उत्फुर्त पणे पदरमोड करून सभेसाठी येत आहेत. तसेच जागोजागी मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा देत आहेत.

एका सामान्य माणसाच्या लाखोंच्या सभा होत आहेत. लोक तासंतास वाट पाहत आहेत. गावोगावी सभेची जय्यत तयारी करत आहेत. शेकडो जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण होत आहे. लाखोंच्या सभा हे सरकारपुढे एक कोडे आहे. १४ तारखेला दिडशे एकर मैदानावर भव्य दिव्य सभा होत आहे. यानंतर दहा दिवस सरकारपुढे शिल्लक आहेत पुढे काय करायचे याचा निर्णय होणार आहे. सध्या तरी सरकार पुढे आरक्षण देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन अधिक तीव्र होणार व मनोज जरांगे हे नेतृत्व करणार असे चित्र दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here