सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वाचवले जखमी दुर्मिळ घुबडाचे प्राण

0
299
जामखेड प्रतिनिधी
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट ) – 
  परिसरात कोठेही अपघात झाला तर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे नेहमीच जखमींना मदत करण्यासाठी पुढे आसतात त्यांना ताबडतोब स्वतः च्या अ‍ॅम्ब्युलन्स मधुन
दवाखान्यात दाखल करतात. यामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. याच बरोबर आतापर्यंत दहा जखमी पशू पक्ष्यांचेही वेळेवर उपचार करत प्राण वाचवलेले आहेत. आज त्यांनी जखमी दुर्मिळ घुबडाचे प्राण वाचवले.
    सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रयत्नाने जखमी दुर्मिळ घुबड पक्षाला जीवदान दिले आज रविवार दिनांक १३/६/२०२१  रोजी सकाळी८ (आठ )वाजता महेश काशीद या मित्राचा फोन संजय कोठारी यांना आला एक जखमी घुबड सारोळा रोडला पडलेले आहे त्याच क्षणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले त्या घुबडाला घेऊन जामखेडला या ते घुबड ताबडतोब घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले असता तेथील रविवार असताना दयानंद शिंदे पाडळी (परिचर )यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून वनरक्षक किसन पवार, प्रवीण उबाळे, श्याम डोंगरे, ताहेर सय्यद यांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी बोलताना वनमजूर ताहेर अली सय्यद यांनी सांगितले की आत्तापर्यंत संजुकाका कोठारी यांनी ५ घुबड, २ हरीण तरस १, सायाळ१, असे जखमी आणलेले पक्षी ,प्राणी वाचवण्यात प्रयत्न केले आहे त्यांना कितीही वाजता फोन करा ते ताबडतोब येऊन त्या पक्षांना प्राण्यांना आपल्या अॅम्ब्युलन्समध्ये आणून पशु वैद्यकीय डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून ते आमच्या ताब्यात  देतात यावेळी वनाधिकारी आणि पशुवैद्यकीय कर्मचारी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि महेश काशीद यांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here