जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
तालुक्यातील नामांकित असलेल्या दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदी शशिकांत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सेक्रेटरी मोरेश्वर देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शशिकांत देशमुख हे सुमारे वीस वर्षापासून संस्थेशी निगडीत असून संस्थेच्या पाँलिटेक्निक काँलेजचे अधिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेले आहे. दि, पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे चार माध्यमिक विद्यालये, दोन उच्च माध्यमिक विद्यालये तर एक सिनिअर काॅलेज आहे. तसेच पाँलिटेक्निक काँलेज आहे. शैक्षणिक बाबतीत प्रगतीपथावर असलेल्या संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी नवनियुक्त सचिव शशिकांत देशमुख हे आपले कौशल्य पणाला लावून संस्थेचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
शशिकांत देशमुख हे जामखेड येथील लोकमान्य तालुका वाचनालयावर सुमारे वीस वर्षापासून संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी सुमारे सतरा वर्ष सकाळ, लोकमत, फुलोरा, काँलेज कट्टा, जामखेड समाचार आदी वृत्तपत्रासाठी पत्रकार व संपादक म्हणून काम केलेले असून शहरातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्थांशी निगडित आहेत.
शशिकांत देशमुख यांच्या दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.