सहकारमहर्षी जगन्नाथ राळेभात यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त रामराव महाराज ढोक व प्रकाश महाराज बोधले यांचे किर्तन

0
408

जामखेड न्युज——

सहकारमहर्षी जगन्नाथ राळेभात यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त रामराव महाराज ढोक व प्रकाश महाराज बोधले यांचे किर्तन

जामखेड तालुक्यात सहकार महर्षी म्हणून ओळख असणारे तालुक्यातील सहकार क्षेत्रातील धुरंधर व मुत्सद्दी राजकारणी तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे सहकार महर्षी जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ ( तात्या ) राळेभात पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त मंगळवार दि. २६ रोजी हभप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक व बुधवार दि. २७ रोजी आखील भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहेत.


आदित्य मंगल कार्यालय बीड रोड जामखेड येथे
मंगळवार दि. २६ रोजी हभप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे रात्री ८ ते १० असे किर्तन होणार आहे. तसेच बुधवार दि. २७ रोजी आखील भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांचे सकाळी १० ते १२ किर्तन होणार आहे तरी परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


जगन्नाथ राळेभात हे जिल्हा बँकेचे पंधरा वर्षे संचालक होते. जामखेड तालुक्यातील सोसायटीच्यांवर त्यांचे मोठे वर्चस्व होते. जगन्नाथ तात्यांना मिस्तरी या नावाने देखील ओळखले जात होते.

जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे दोन्ही मुले सहकाराचा वारसा समर्थ पणे चालवत आहेत.


जगन्नाथ राळेभात यांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी बँक कर्जाच्या माध्यमातून मदत करुन कन्यादान करणारं सहकार महर्षी नेतृत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मंगळवार दि. २६ रोजी हभप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक व बुधवार दि. २७ रोजी आखील भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here