जामखेड न्युज——
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव १४ वर्षे वयोगटातील मुलींची बाजी
जामखेड तालुका शालेय क्रीडा समिती व जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि २१ सप्टेंबर रोजी शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धा १४ वर्षे वयोगटातील कबड्डी स्पर्धेत श्री भैरवनाथ विद्यालयाच्या मुलींनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे यामुळे जिल्ह्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यालयाच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.
विद्यालयाच्या यशाबद्दल दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सज्ञ सर्व संचालक मंडळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे,तसेच प्राचार्य रमेश अडसुळ, क्रीडा शिक्षक, दिनेश शिंदे व राजेंद्र उदावंत गावचे सरपंच, उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
वयोगट -14 वर्षे मुलीच्या संघाने छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय खर्डा येथे झालेल्या तालुकास्तरीय
कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेतील सहभागी खेळाडू पुढील प्रमाणे
सहभागी खेळाडू
१.कु. प्रतीक्षा ढवळे
२.कु. सिमरन सय्यद
३.कु. वैष्णवी ढवळे
४. कु. भाग्यश्री ढवळे
५.कु. समीक्षा ढवळे
६.कु. श्रुतिका खरात
७.कु. मयुरी ढवळे
८.कु. सुहानी ढवळे
९.कु. सानिका मस्के
१०.कु. प्रियंका तांबे
११.कु. साक्षी ढवळे
१२.कु. श्रावणी बोराटे
यांना क्रीडा शिक्षक राजेंद्र उदावंत व दिनेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.