कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या संचालकांचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना साकडे

0
384

जामखेड न्युज——

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या संचालकांचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना साकडे

 

 

जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यासोबत जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिष्ट मंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पणन मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांची भेट घेऊन जामखेड तालुक्यात कांदा उत्पाद कांदा अनुदानात जे 3500 शेतकरी वंचित राहिले आहेत अशा शेतकऱ्यांना तातडीने कांदा अनुदान मिळावं यासाठी आमदार राम शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार साहेब व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्व वस्तुस्थिती समजावून सांगून सदर कांदा अनुदानात आपण स्वतः लक्ष देऊन जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली


त्याला प्रतिसाद देत पणन मंत्री महोदय यांनी तातडीने पणन उपसंचालक, अहमदनगर जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन कांदा अनुदानात अपात्र झालेल्यां शेतकऱ्यांच्या आर्जाची तपासणी करावी असे आदेश दिले.


आमदार राम शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना जामखेड तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती ची माहिती देऊन, त्यावर उपाययोजना करण्यासाठी जामखेड तालुक्यामध्ये चारा चारा, छावण्या पाण्याचे टँकर, पीक विमा ईत्यादि बाबत चर्चा केली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासित केले की दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून मी कर्जत जामखेड मधील जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मतदारसंघांमध्ये कसल्याही निधी कमी पडू दिला जाणार नाही.


सोबत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, अंकुश ढवळे, राहुल बेदमत्ता, नंदू गोरे, डॉक्टर गणेश जगताप, सुरेश पवार, बबन हुलगुंडे व कांदा कांदा उत्पादक शेतकरी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here