जामखेड न्युज——
शिवशंभु प्युअर वॉटर जामखेड च्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान
माझा शिक्षक माझा अभिमान गुणवंत शिक्षकांचा सन्मान
क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नायगाव शाळेतील शिक्षक श्री.लक्ष्मीकांत ईडलवार व अहमदनगर जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बसरवाडी शाळेतील एकनाथ चव्हाण यांचा शिक्षकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी नायगाव केंद्राचे माजी केंद्रप्रमुख किसन वराट, नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख बाबा कुमटकर, यादव नाना, पिंपरे सर, लव्हाळे सर, मडके सर, नाना मोरे, केशव कोल्हे , अर्जुन घोलप, सोळंके सर, पवार सर, राऊत सर, भोसले सर, होले सर, लगड सर, अभिमान घोडेस्वार , तनपुरे सर, घुमरे सर आदि शिक्षक उपस्थित होते.
आज गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी आपल्या तालुक्याचे आदर्श व प्रेरणादायी शिक्षकांचा सत्कार समारंभ प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली व शिवशंभु प्युअर वॉटर जामखेड यांचे वतीने आयोजित केला होता यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.