Saturday, March 14, 2026
Home शैक्षणिक बातम्या भावी पिढी घडविणारा मुर्तीकार सध्या दुर्लक्षित – संतोष निकम राजकुमार थोरवे...

भावी पिढी घडविणारा मुर्तीकार सध्या दुर्लक्षित – संतोष निकम राजकुमार थोरवे यांना सोलापूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

0
157

जामखेड न्युज——

भावी पिढी घडविणारा मुर्तीकार सध्या दुर्लक्षित – संतोष निकम

राजकुमार थोरवे यांना सोलापूर येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

 

शिक्षक हा भावी पिढी घडविणारा मुर्तीकार आहे पण त्यांना शिकवण्यापेक्षा अशैक्षणिक कामे देऊन अधिक कामाची अपेक्षा केली जात आहे. हे बरोबर नाही सध्या शिक्षकांकडे कल्लुषित नजरेने पाहिले जात आहे. भावी पिढी घडविणारा मुर्तीकारच सध्या दुर्लक्षित आहे. शिक्षकांच्या मागण्यासाठी पुढील महिन्यात मोठे आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी सांगितले.

सोलापूर येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित, राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघातर्फे राज्यस्तरीय साठ शिक्षक आणि १४ शाळांना आदर्श पुरस्कार वितरण संपन्न झाले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, संयोजक बापुसाहेब अडसूळ, अभिजीत पाटील, प्राचार्य खिल्लारे, कपिल कोरके, अनिरूध्द पवार, देसाई साहेब, संतोष गायकवाड, मनिष काळजे शिवसेना जिल्हाप्रमुख, दत्तात्रय काळे, नन्नवरे साहेब, रमेश देसाई, महारुद्र नाळे शिक्षणाधिकारी, मोतीवरे सर, तानाजी कचरे, गोपाळवाडीचे सरपंच संतोष थोरवे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्योजक अभिजीत पाटील म्हणाले की, शिक्षक हा समाजाचा कणा आहे. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान करणे खुपच चांगला उपक्रम राबविला आहे. पुढील वर्षापासून महिलांनाही पुरस्कार द्यावेत,शिक्षक समाजासाठी झटत असतात.

माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे म्हणाले की, पुरस्कारामुळे अधिक चांगल्या कामाची प्रेरणा मिळते, पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे. शिक्षक चांगली पिढी निर्माण व्हावी म्हणून झटत असतात

शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे, बापुसाहेब अडसूळ, दत्तात्रय काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रम स्थळी कर्णिकनगर अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी गीत गायण करत उपस्थित प्रेशकांना मंत्रमुग्ध केले.

 

श्री साकेश्वर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक राजकुमार थोरवे यांना राज्यस्तरीय आदर्श  शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

राजकुमार थोरवे हे जिजामाता माध्यमिक हायस्कूल देवदैठण येथे सहशिक्षक म्हणून १९९४ साली रूजू झाले. येथे इंग्रजी विषयाच्या अध्यापनाबरोबरच क्रीडा शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली त्यांच्या प्रयत्नातून अनेक विद्यार्थी घडले तसेच महाराष्ट्र छात्र सेनेच्या माध्यमातून देवदैठण येथील अनेक विद्यार्थी सैन्य दलात दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विविध पदांवर विराजमान आहेत. तसेच वीस वर्षे देवदैठण येथे सेवा केल्यानंतर दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयात नियुक्ती झाली.

यानंतर २०१५ पासून श्री साकेश्वर विद्यालयात बदली झाली ते आजपर्यंत या विद्यालयात सेवा करत आहेत. प्रभावी अध्यापनाबरोबरच क्रीडा क्षेत्रात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले आहेत. शैक्षणिक उपक्रमाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात ते सतत पुढे असतात. गोरगरीब विद्यार्थांना मदत, तसेच शालेय शिस्त, विद्यालयात वृक्षारोपण यात नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या याच कार्याचा गौरव राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित, राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर करत केला आहे.

त्यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर होताच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच, शिवपट्टन ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्षा ज्योतीताई गोलेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद भोरे, डॉ. संजय भोरे,माजी उपसरपंच सुरेश भोरे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, हभप कैलास महाराज भोरे, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग व सर्व स्टाफ, श्री साकेश्वर विद्यालयायाचे मुख्याध्यापक दत्ता काळे व सर्व स्टाफ व विद्यार्थी, जिजामाता माध्यमिक हायस्कूल देवदैठणचे मुख्याध्यापक संजय वराट व सर्व स्टाफ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, प्रा. अरूण वराट, श्री भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य रमेश अडसूळ, न्यू इंग्लिश स्कूल राजुरीचे मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, तसेच जामखेड तालुका क्रीडा संघटना याचबरोबर डॉ. भगवानराव मुरूमकर, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, ज्ञानदेव मुरूमकर, ग्रामपंचायत सदस्य शहादेव वराट, पोलीस पाटील महादेव वराट, राम ढवळे, छावा छात्रवीर संघटनेचे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष शत्रुघ्न भोसले, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष बेंबळे तसेच माजी सरपंच गोविंदराव भोसले, माजी उपसरपंच एकनाथराव भोसले,कल्याणराव मेटे, अंबॠषी मेटे, अरूण थोरवे, उदयकुमार दाहितोंडे, गोपाळवाडीचे सरपंच संतोष थोरवे, माजी सरपंच नेताजी चव्हाण यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!