जामखेड न्युज——
वीस वर्षांचा मुलगा हरवला
चिचोली काळदात ता.कर्जत जि. अहमदनगर येथून राहत्या घरातून वीस वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला आहे. कोणाला आढळल्यास मिरजगाव पोलीस स्टेशन किंवा अनिरूध्द सिद्धिविनायक मंत्री रा. चिंचोली काळदात मो. नंबर 7083316556 यांच्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत मुलाचे वडी अनिरूध्द सिद्धिविनायक मंत्री वय 42 वर्षे धंदा शेती रा. चिचोली काळदात ता.कर्जत जि. अहमदनगर मोनं. 7083316556 यांनी मिरजगाव ता. कर्जत पोलीसात खबर दिली आहे की, दि.1/9/2023 रोजी खबर दिली की मुलगा राज उर्फ अथर्व अनिरुद्ध मंत्री वय 20 वर्षे धंदा शिक्षण रा चिचोली काळदात ता. कर्जत जि.अहमदनगर रंगाने गोरा उंची 170 सेमी. अंगात गुलाबी रंगाचा शर्ट काळ्या रंगाची अरमानी पॅन्ट, समोरील चार दात पुढे आलेले, पायात चप्पल वर्णन असलेला राहाते घरातुन निघुन गेला आहे.
मुलगा नामे राज उर्फ अथर्व अनिरुद्ध मंत्री वय 20 वर्षे धंदा शिक्षण रा चिचोली काळदात ता कर्जत जि. अहमदनगर हा घरात कोणास काही एक न सांगता राहाते घरुन निघुन गेला आहे आम्ही
त्याचा मित्र मंडळी नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु तो कोणाकडेही नाही तरी त्याचा शोध होणेस विनंती आहे. वगैरे ची. खबर वरुन मिरजगाव पोस्टे मनुष्य मिर्सिग दाखल करण्यात आली असुन पुढील तपास पोहेकाँ एस एस माळशिखरे हे करीत आहेत.
तरी कोणाला वरील वर्णनाचा मुलगा आढळल्यास
मिरजगाव पोलीस स्टेशन किंवा अनिरूध्द सिद्धिविनायक मंत्री रा. चिंचोली काळदात मो. नंबर 7083316556 यांच्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.