सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांना समाजसेवक युवा पुरस्कार प्रदान

0
102

जामखेड न्युज——

सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांना समाजसेवक युवा पुरस्कार प्रदान

 

जामखेड तालुक्यातील मौजे डोणगाव या ठिकाणी दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांच्या हस्ते खर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांना समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी मानव हित लोकशाही पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, लहुजी विद्रोही शक्ती सेनेचे महाराष्ट्राचे नेते नानासाहेब वालेकर, जामखेड येथील प्राचार्य विकी घायतडक, सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे, ह भ प विश्वनाथ महाराज, पत्रकार समीर शेख,पाटोदा सरपंच गफार पठाण,व लहुजी शक्ती सेनेचे जामखेड तालुका अध्यक्ष पोपटराव फुले, स्थानिक ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा सन्मान देण्यात आला. हार, फेटा, शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन गणेश जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

दिनांक 29 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मौजे डोणगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आनंद ऋषीजी नेत्रालय येथील डॉक्टरच्या टीमने अनेकांचे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी केली. तसेच यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला. यामध्ये मानव हित लोकशाही पक्षाचे पुणे जिल्ह्यध्यक्ष अनिल भाऊ कांबळे यांनाही समाजसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात काम करणारे, चळवळीत काम करणारे, प्रबोधनकार , इत्यादींना पुरस्कार देण्यात आले.

यावेळी प्रा.विकास बगाडे, तृप्ती उकिरडे, बाळासाहेब शिंदे , विजय शिंदे,गणेश,शिंदे, शिवाजी पुलवले,विश्वनाथ महाराज,प्राचार्य विकी घायतडक, अनिल कांबळे इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली. जामखेड तालुक्यातील पाडळी, फक्राबाद, धामणगाव, हरी नारायण आष्टी,देविगव्हण , नागोबची वाडी,कर्जत इत्यादी गावातून लहू सैनिक उपस्थित होते.

खर्डा येथील समाजासाठी झटणारे तळमळीचे युवा तरुण कार्यकर्ते गणेश जाधव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल खर्डा येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार बाळासाहेब शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here