जामखेड न्युज——
जीवन खुपच सुंदर आहे सहजासहजी त्यागू नका – हभप उत्तम महाराज वराट
जीवनात नैराश्य आल्यावर वारकरी संप्रदायाचे पाईक व्हा!!
गेल्या काही दिवसांपासून जमदारवाडी गावात तरूणांच्या आत्महत्या होऊ लागल्या आहेत गुरूवारी दि. २४ ऑगस्ट रोजी शरद भिकु राळेभात या युवकाने आत्महत्या केली या बाबत प्रबोधन करताना हे. भ. भ. प. उत्तम महाराज वराट म्हणाले की कलयुगात बहुतेक गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा आजचा तरूण का सहजासहजी एवढं चांगलं जीवन संपवण्याच्या मागे लागला आहे पुर्वीच्या काळात पोटाला पोटभर अन्न, अंगाला वस्त्र व निवारा मिळत नव्हते कोणत्याही भौतिक सुविधा नव्हत्या.
शिक्षण घ्यायचं म्हटलं तर दहा दहा किलोमीटर पायी प्रवास करावा लागत होता सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळे पर्यंत मरणप्राय कष्ट करावे लागायचे परंतु कितीही हलाखीचे दिवस असले कितीही अडचणी असल्या तरी आत्महत्या करावी जीवन त्यागाचे असा विचार मनाला शिवतही नव्हता परंतु आजची तरुण पिढी आसा विचार करत नाही व शुल्लक कारणांवरून परमेश्वराने दिलेला देह संपवत आहेत या वेळी महाराजांनी तरूणांना अवहान केले की माझी विनंती आहे तुम्हाला कितीही दुःख येऊ द्या कसलाही प्रसंग तुमच्यावर येऊ द्या तुम्ही आम्हा महाराज लोकांकडे या तुमच्या व्यथा सांगा नक्कीच मार्ग काढू आम्हाला नाही मार्ग काढता आला तर एक नक्की शब्द देतो की तुम्हाला जगवण्याची जबाबदारी आमची आहे ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराची ताकद एवढी मजबूत आहे की ती नक्कीच तुमच्यात परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही.
आज जमदारवाडी या गावाविषयी खूप मोठा स्वाभिमान अंतकरणात आहे अनेक क्षेत्रांमध्ये या गावातील सर्व मंडळी खूप चांगलं काम करत आहेत परंतु ह्या अशा घटना बघितल्यानंतर अंतकरणाला खूप दुःख होतं
आज न्याय देण्यासाठी अनेक यंत्रणा आहेत त्या यंत्रणेचा वापर करा आणि आज या तरुण पिढीला या मरणापासून वाचवा मनुष्य जीवन पुन्हा भेटत नाही ही तर गोष्ट महत्त्वाची आहेच परंतु आज जे आपल्या आई-वडिलांचा बायका मुलांचा विचार न करता हे अंतिम टोक गाठतात आणि या सगळ्या परिवाराला वाऱ्यावर सोडतात ही गोष्ट अतिशय दुःख देणारी आणि अवघड आहे.
संतांचे विचार नक्कीच तारक आहेत त्या संतांच्या विचाराचा अंगीकार करा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारांचा चिंतन मंथन करा आणि आपलं जीवन सुखमय करा
पुढच्या काळात अशी घटना आपल्या गावात घडणारच नाही यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न करावे आसे महाराजांनी सांगितले गेली तीस वर्षे सालाबाद प्रमाणे ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने या नाम सप्ताहाचे उत्कृष्ट अयोजन करण्यात येते नित्यनेमाने सात दिवस दररोज सकाळी ४ते६ काकडा भजन,६ते ७ विष्णुसह्रनाम, ७ते१०ज्ञानेश्वरी पारायण ११ते१२गाथा भजन ४ते५प्रवचन ६ते७ हरिपाठ ७ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित महाराजांच्या किर्तन सेवा होणार आहेत.
त्यानंतर दररोज किर्तनानंतर भोजनाचीही व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी किर्तन श्रवण व भोजनाचा आस्वाद घ्यावा आसे अवहान जमदारवाडी ग्रामस्थांनी केले आहे
सप्ताहातील किर्तने
२३ऑगस्ट मनोहर महाराज इनामदार सर जामखेड
२४ऑगस्ट दत्ता महाराज आजबे आळंदी
२५ ऑगस्ट वारकरी भुषण उत्तम महाराज वराट साकत
२६ ऑगस्ट वारकरी भुषण कैलास महाराज भोरे देवदैठण यांची किर्तने झाली
आज २७ ऑगस्ट झी टाॅकीज फेम शिवशाहीर कल्याण महाराज काळे शेवगाव
२८ ऑगस्ट वारकरी भुषण दत्ता महाराज अंबीरकर डिकसळ
२९ ऑगस्ट वैराग्यचे महामेरू रघुनाथ महाराज चौधरी धामणगाव
३० ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.