जामखेड न्युज——
बिऱ्हाड पदयात्रा इशाऱ्याच्या दणक्याने भटक्यांच्या मदारी वसाहतीच्या कामाला सुरुवात
ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या प्रयत्नाने मदारी समाजाला मिळणार हक्काची घरे!!
खर्डा (ता.जामखेड) येथील मदारी समाजाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास खर्डा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड पदयात्रा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात येईल असे भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ.अरुण (आबा)जाधव यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी अहमदनगर निवेदन देऊन इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत ताबडतोब तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाला सुरुवात झाली. यामुळे मदारी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली 7 वर्षापासून जामखेड तहसील कार्यालय,जामखेड पंचायत समिती,,आमदार रोहित पवार यांचे संपर्क कार्यालय,खर्डा चौक व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अनेक वेळा आंदोलने केली प्रत्येक आंदोलनाच्या वेळी खोटी आश्वासने मिळाली मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही राजकीय पुढार्याच्या श्रेय वादातून या मदारी बांधवांना कित्येक वर्षापासून पालात राहावे लागले.. या महालात राहणाऱ्यांना.. पालात राहणाऱ्याची वेदना काय माहित ? असे ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले बिऱ्हाड पदयात्रा निवेदन देऊन इशारा दिला.
या निवेदनाचा विचार करून ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या बिऱ्हाड पदयात्रा या इशाराने दि.26 ऑगस्ट 2023 रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी मा.योगेश चंद्रे (साहेब) तहसीलदार म्हणाले खर्डा येथील मदारी वसाहतीसाठी गट.नं.1141 मधील एक हेक्टर जागा आहे. ती जागा यशवंतराव चव्हाण वसाहती अंतर्गत या मदारी वसाहतीसाठी शासनाने मंजूर केली आहे.त्या अनुषंगाने ही जागा आज मोजणी करून त्याची सपाटीकरण करत आहे.लवकर लेआउट मंजूर झाला आहे लेआउट मंजूर करून त्याचप्रमाणे प्रत्येक प्लॉटची मोजणी करून त्याचा ताबा मदारी बांधवांना दिला जाणार आहे. व जागेचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी गेली 7 वर्षापासून कार्यकर्त्यांना घेऊन लढतात असे भटक्याचे नेते ॲड.डॉ.अरुण जाधव यांचे कौतुक केले.
यावेळी योगेश चंद्रे साहेब (तहसीलदार) महेश जानकर (API खर्डा) सिद्धनाथ भजनावळे (विस्तार अधिकारी) प्रशांत सातपुते (ग्रामसेवक) श्रीराम कुलकर्णी (तलाठी )कैलास खैरे ग.अ दत्तराज पवार (पत्रकार) लोखंडे (उपसरपंच) मा.बापू ओहोळ (लोकाधिकार आंदोलन प्रवक्ते) मा. अतिश पारवे (ता.अध्यक्ष.वं.ब.आ) रवी सुरवसे,विशाल पवार,गणपत कराळे,दिपाली काळे, हुसेन मदारी,सलीम मदारी, मुस्तफा मदारी, सरदार मदारी, फकिरा मदारी, आलेश (भाऊ),संतोष चव्हाण उपस्थित होते.