जामखेड न्युज——
जामखेड जनविकास संस्थेच्या वतीने राजूर प्रकल्पात अदिवासी कुटुंबासाठी वैयक्तिक लाभ योजनांची प्रकरणे दाखल – लक्ष्मी पवार
जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने राजूर प्रकल्पात वैयक्तिक लाभाच्या योजनांचे प्रकरणे दाखल केलेली आहेत अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली
जामखेड तालुक्यातील आदिवासी समाजातील कुटुंबांना आदिवासी विकास विभाग अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांचे फाॅर्म राजूर प्रकल्पात जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी ताई पवार यांनी दाखल केले. यामुळे अदिवासी कुटुंबासाठी विविध वैयक्तिक लाभाच्या योजना मिळणार आहेत.
आदिवासी विकास विभाग अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या ८५% अनुदानावर पिठाची गिरणी, ब्युटी पार्लर व्यवसाय, ब्रॅण्डिंग पॅकिंग मशिन अशा विविध प्रकारच्या योजनांचे फाॅर्म दाखल केले. यावेळी राजूर प्रकल्पाचे कनिष्ठ लिपिक प्रमोद शिंदे, जाधव मॅडम, पारूबाई वराट, संतोष गर्जे, किशोर सांगळे आदी उपस्थित होते.
शासकीय कार्यालयात येऊन जातीचा दाखला मिळवण्यासाठी किचकट प्रक्रिया पूर्ण होत नाही हीच अडचण ओळखून लक्ष्मी पवार यांच्या जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील पाचशे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.