जामखेड न्युज——
पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळा संपण्याआधीच जामखेड खर्डा महामार्गावरील खड्डे बुजवत वाहनधारकांना दिला सुखद धक्का
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजवत असते पावसाळ्यात खड्ड्यांचा वाहनधारकांना खुप त्रास सहन करावा लागतो म्हणून यावर्षी जामखेड बांधकाम विभागाने उपअभियंता शशिकांत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा ते जामखेड महामार्गावरील खड्डे बुजवत वाहनधारकांना सुखद धक्का दिला आहे. तसेच तालुक्यातील इतरही राज्यमार्ग व जिल्हा मार्ग यावरील खड्डे बुजवण्यात येतील असे बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार यांनी सांगितले.
खर्डा ते जामखेड म्हणजे खुपच रहदारीचा रस्ता आहे. शिर्डी ते हैदराबाद वाहतूक याच मार्गाने होते. आंध्रप्रदेशचे शिर्डीला येणारे भाविक व नगर नाशिक चे बालाजीला जाणारे भाविक याच मार्गाने जातात यामुळे सतत वर्दळ असते. महामार्गावरील खड्डे यामुळे वाहनधारकांना खुप त्रास सहन करावा लागतो हीच अडचण ओळखून बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार यांनी योग्य नियोजन करत पावसाळा संपण्याआधीच खड्डे बुजवले आहेत. या महामार्गावरून शिर्डी व बालाजी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी आता सलग रस्ता चांगला झाला आहे. खर्ड्याच्या पुढे भूम तसेच पार्डी फाटा आता सिमेंट रस्ता आहे. पुढे तर चांगलाच आहे.
दरवर्षी पावसाळा संपल्यावर डिसेंबर महिन्यात खड्डे बुजवण्यास सुरूवात केली जाते भर पावसाळ्यात वाहनधारकांना खुप त्रास सहन करावा लागतो.
यावर्षी मात्र उपअभियंता शशिकांत सुतार यांनी योग्य नियोजन करत पावसाळा संपण्याआधीच खड्डे बुजवत वाहनधारकांना सुखद धक्का दिला आहे. याबद्दल वाहनधारकांनी बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.
चौकट
बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील जिल्हामार्ग व राज्यमार्ग यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात येतील असे उपअभियंता शशिकांत सुतार यांनी सांगितले