जामखेड न्युज—–
दोन दिवसांत ट्रान्सफॉर्मर न बसवल्यास अधिकाऱ्याला काळे फासणार, सोनेगाव ग्रामस्थांचा इशारा
तालुक्यातील सोनेगाव येथील ट्रान्सफॉर्मर एक महिन्यापासून जळाल्याने संपूर्ण गाव महिन्यापासून अंधारात आहे वारंवार मागणी, अर्ज, विनंती करूनही ट्रान्सफॉर्मर बसवलेला नाही त्यामुळे संपूर्ण गाव अंधारात आहे. याचा संपूर्ण गावाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसांत ट्रान्सफॉर्मर न बसवल्यास अधिकाऱ्याला काळे फासणार असा इशारा दिला आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा जवळील सोनेगाव येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे एक महिन्यापासून सोनेगाव गावठाणची डीपी बंद असून त्यामुळे जनता त्रस्त, तर अधिकारी झोपा काढण्यात व्यस्त, आहेत का? असा सवाल नागरिकां मधून विचारला जात आहे.
यासंदर्भात वेळोवेळी निवेदन व मागणी करूनही डीपी मिळत नसल्याने सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एक महिन्यापासून सोनेगावकर ग्रामस्थ अंधारात आहेत, सोनेगाव येथील गावठाणची डीपी एक महिन्यापासून बंद आहे वारंवार मागणी करूनही डीपी मिळत नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून पुढील दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास दिनांक 28 ऑगस्ट रोजी खर्डा उपकेंद्रावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा सोनेगाव ग्रामस्थांनी दिला आहे.
मोर्चा काढूनही विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास सोनेगाव ग्रामस्थांनी जामखेड सह कर्जतच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन दिवसात काय होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.