जामखेड न्युज ——-
सनराईज शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांचा एसआरपीएफ केंद्रात विविध स्पर्धेत सहभाग घेत शस्त्रप्रदर्शनाची पहाणी
सनराईज शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांचां कुसडगाव येथील एसआरपीएफ केंद्रामध्ये शस्त्रप्रदर्शनाची पहाणी करत विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला यामुळे विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव घेतला.
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसडगाव आयोजित क्रीडा स्पर्धेचे तसेच अभिनव उपक्रम व विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शन व प्रात्यक्षिक तसेच परेड कवायत, खालीहात कवायत,पी टी क्लास व रांगोळी स्पर्धा,लिंबू चमचा,संगीत खुर्ची,कब्बडी,खो – खो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.यावेळी सनराईज शैक्षणिक संकुलाच्या साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व.एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेज पाडळी फाटा व स्व. विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगांव येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिके मिळवली.
तसेच या अभिनव उपक्रमाचे आयोजक समादेशक सहाय्यक विकास पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर मोर्ला, दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक वैभव टेकवडे, पांडुरंग बुरांगे, अजित कुंभार, संदीप जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शस्राबद्दल माहिती दिली.
यावेळी उपस्थित प्राचार्या अस्मिता जोगदंड यांनी सर्व विद्यार्थ्याना दोन दिवस विविध स्पर्धेत सहभागी करून घेतल्या बद्दल संकुलाच्या वतीने सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले.
यावेळी उपस्थित सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी,व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते