नागपंचमी निमित्त ल. ना. विद्यालयात साप आपला मित्र चित्र प्रदर्शन, शेकडो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देत जाणून घेतली विषारी व बिनविषारी सापाबद्दल माहिती

0
217
  • जामखेड न्युज——

  • नागपंचमी निमित्त ल. ना. विद्यालयात साप आपला मित्र चित्र प्रदर्शन

  • शेकडो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देत जाणून घेतली विषारी व बिनविषारी सापाबद्दल माहिती

 

साप हा मानवासाठी खुप उपयुक्त असला तरी आपल्या मनात सापाबद्दल भीती तिरस्कार आहे. यामुळे सापांची हत्या होते. सापांची संख्या कमी होणे मानवासाठी हानिकारक आहे. याची जाणीव पूर्वजांना झाली म्हणूनच भारतीय संस्कृतीत साप हा देवाचे प्रतिक मानले व श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी सण साजरा केला जातो व सापांची पुजा केली जाते. याचेच औचित्य साधून ल. ना. होशिंग विद्यालयात साप आपला मित्र चित्र प्रदर्शन भरविण्यात आले याचा शेकडो विद्यार्थ्यांनी फायदा घेतला व सापाबद्दल माहिती जाणून घेतली.

 

ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 23 ऑगस्ट 2023 बुधवार रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे व दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे, पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड ईश्वर कोळी, समारंभ प्रमुख पोपट जगदाळे, शिक्षक प्रतिनिधी किशोर कुलकर्णी, विज्ञान प्रमुख बबनराव राठोड, एनसीसी प्रमुख अनिल देडे, कलाशिक्षक मुकुंद राऊत समाजशास्त्र विभाग प्रमुख विशाल पोले, आदित्य देशमुख, साई भोसले, पंकज पोकळे, स्वप्नील जाधव, विकास पाचरणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


साप बधितलं कि, अंगावर काटा उभा राहतो. समाजात सापाबद्दल खुप गैरसमज आहेत. परिसरात दिसणारे काही विषारी तर काही बिनविषारी साप आहेत. याची माहिती चित्र प्रदर्शनातून मिळाली. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना सांगितले यावेळी अनेक शाळांनी भेटी दिल्या व विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.

यावेळी चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते तसेच बाटलीत विविध प्रकारचे साप विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

जिल्हा परिषद शाळांनी भेट देत दिला अभिप्राय

कलाध्यापक शाळेच्यावतीने केले आहे. यामधे सापाची ‘विषारी, बिनविषारी, एक- सारखे दिसणारे साप व सर्पदंश करावयाचा पहावयास मिळाली.
झाल्यानंतर प्रथमोपचार’ या अशी माहिती
आमच्या जि.प. प्रा. शाळा मराठी मुले, जामखेड
शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी या आगळ्या-
वेगळ्या चित्रप्रर्दशनास भेट दिली व अभिप्राय दिला.

विविध प्रकारचे बाटलीतील प्रत्यक्ष साप, चित्र
व सेट पाहून सर्व विद्यार्थी आनंदीत झाले होते.
काहीतरी नविन अनुभव घेतल्याचा भाव त्यांच्या
चह्त्यावर दिसुन येत होता. प्रदर्शन खुपच सुंदर, उपयुक्त आणि आनंद- दायी आहे.

चौकट

सर्प आपला मित्र आहे या प्रदर्शनासाठी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक बी ए पारखे, पर्यवेक्षक पी टी गायकवाड, कलाशिक्षक राऊत मुकुंद, विज्ञान प्रमुख बबन राठोड, आदित्य देशमुख, साई भोसले, स्वप्नील,श्री पंकज पोकळे, विकास पाचरणे, आशिष काळे, स्थानिक कलावंत अनिल खेत्रे या सर्वांनी प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here