पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांना दृष्टी देणारे दृष्टी आय क्लिनिकचे डॉ. नाना जरे

0
285

जामखेड न्युज——

पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांना दृष्टी देणारे दृष्टी आय क्लिनिकचे डॉ. नाना जरे

 

दृष्टी आय क्लिनिक च्या माध्यमातून गेल्या तेरा वर्षापासून लोकांना दृष्टी देण्याचे काम डॉ. नाना जरे करत आहेत. आतापर्यंत पन्नास हजार पेक्षा जास्त लोकांना दृष्टी देत डोळस बनवले आहे. पुण्यात स्वतः चे हाँस्पिटल असताना मातृभूमी परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दर शनिवारी रविवारी जामखेडला येऊन परिसरातील नागरिकांची डोळ्याची तपासणी, चष्मा नंबर तसेच विविध शस्त्रक्रिया करतात दर शनिवारी रविवारी त्यांच्या कडे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शनिवारी तपासणी व रविवारी शस्त्रक्रिया करतात आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक शस्त्रक्रिया करत या लोकांना दृष्टी देण्याचे काम डॉ. नाना जरे यांनी केले आहे.

 

हाँस्पिटल मधील उपलब्ध सुविधा

बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फेकाइमल्सिफिकेशन शस्त्रक्रिया,
भुल न देता मोतीबिंदू शस्त्रक्रियेची खास सोय,
संगणकीय नेत्र तपासणी,
कृत्रिम भिंगारोपण, कान्टँक्ट लेन्स सुविधा, तिरळेपणा, लासुर,
नेत्रपटल व पापणीवर शस्त्रक्रिया,
काचबिंदू शस्त्रक्रिया,
लेझर उपचार

आतापर्यंत केलेली सेवा

 

आतापर्यंत डॉ. नाना जरे यांनी सिनियर कन्सल्टंट व्ही एच. देसाई येथे फारच अपवर्तक आणि आँक्युलोप्लास्टिक सर्जन म्हणून दहा वर्षांपासून काम करत आहेत.

तसेच गेल्या १४ वर्षापासून सिनियर कन्सल्टंट म्हणून सह्याद्री हाँस्पिटल पुणे येथे काम करत आहेत.

पुणे हडपसर येथे स्वत:चे नोव्हा दृष्टी डोळ्यांचे हाँस्पिटल आहे.

प्रतिष्ठित भारतीय नेत्रविज्ञान जर्नल म्हणून दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत.

अमेरिकन अँकँडमी नेत्रशास्त्र या विषयावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आर्टिकल प्रसिद्ध झाले आहेत.


मानवाला लाभलेल्या ज्ञानेंद्रियांमध्ये डोळे सर्वांत महत्त्वाचे असतात. बाह्य जगातील सर्व काही मेंदूपर्यंत पोहोचविणारे ते दार आहे. निसर्ग किंवा परमेश्‍वराने मानवाला दिलेल्या दोन सर्वोत्कृष्ट देणग्या म्हणजे मेंदू आणि डोळे. कोणत्याही कलेत प्रावीण्य मिळवायचे, तर दृष्टी चांगलीच असावी लागते. वैमानिक होण्यासाठी तर चांगले डोळे हीच मूलभूत पात्रता असते. एवढ्या अनमोल डोळ्यांची काळजीसुद्धा तेवढीच घ्यावी लागते. प्रख्यात नेत्रतज्ज्ञ आणि

जामखेड न्युजशी बोलताना डॉ. नाना जरे म्हणाले की, आपल्या डोळ्यांना त्रास जाणवत असल्यास वेळेवर नेत्रतज्ज्ञांकडे जाऊन उपचार सुरू करावेत. फॅशन म्हणून चष्मा वापरू नका. डोळ्यांचा विकार होण्यामागे जन्मजात दोष, आनुवंशिक आजार, अपघाती इजा, जंतूंचा प्रादुर्भाव, ॲलर्जी, कुपोषण, स्वयंउपचार अशी विविध कारणे असू शकतात. त्याबाबत वेळेवर डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू करणे महत्त्वाचे असते.

स्टेरॉईड्सबद्दल सावधान!

अँलर्जीमध्ये स्टेरॉईड्स हे प्रमुख औषधं आहे. स्टेरॉईड जरी फायदेशीर असले तरीही त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. जास्त प्रमाणात किंवा जास्त काळ औषधं वापरल्यामुळे दुष्परिणाम होतात. डोळ्यात मोतीबिंदू, काचबिंदू, बुबुळाला जखम होऊ शकते. तसंच जंतूसंसर्गाचे प्रमाण वाढते. या सर्व दुष्परिणामांचा इलाज करता येतो. तरीही त्या दुष्परिणामांमुळे डोळ्याची नजर कमी होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळता येण्यासारखं आहे. त्यासाठी खालील सूचनांचे पालन करावं लागेल.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध वापरू नये.

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हे औषध व्यवस्थित टाकणं.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फेर तपासणी वेळच्यावेळी करणं आवश्यक.

जर काही त्रास होत असेल तर लगेच तुमच्या डॉक्टरांना दाखवून घ्या.

डॉ. नाना जरे यांचे पुणे हडपसर येथे स्वत:चे नोव्हा दृष्टी डोळ्यांचे हाँस्पिटल आहे. परंतु सर्वच लोकांना पुण्यात जाऊन उपचार करणे शक्य नाही म्हणून डॉ. जरे दर शनिवारी व रविवारी जामखेड येथे येतात व डोळ्यांच्या विविध समस्या विषयी मार्गदर्शन तसेच चष्मा नंबर तसेच शस्त्रक्रिया करतात. आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक शस्त्रक्रिया करत लोकांना डोळस बनवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here