जामखेड चे खेळाडू रोहित थोरात, श्रेयश वराट व विशाल धोत्रे यांची राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेसाठी निवड

0
109

जामखेड न्युज——

जामखेड चे खेळाडू रोहित थोरात, श्रेयश वराट व विशाल धोत्रे यांची राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेसाठी निवड

 

सॅम्बो असोशियशन ऑफ महाराष्ट्र च्या मान्यतेने औरंगाबाद जिल्हा सॅम्बो असोशियशन आयोजित विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सब-ज्युनिअर गटामध्ये आयडियल स्पोर्टस् अकॅडमी, जामखेड चा खेळाडू श्रेयस सुदाम वराट याने सुवर्णपदक मिळविले.सिनियर गटामध्ये रोहित थोरात व विशाल धोत्रे यांनी सुवर्ण पदक तर संकेत मासाळ याने रौप्य पदक मिळविले.

सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना प्रशिक्षक प्रा.लक्ष्मण उदमले व शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सर्व खेळाडूंचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात, उमेश देशमुख प्राचार्य श्रीकांत होशिंग, मा. प्राचार्य श्रीराम मुरुमकर सह तालुक्यातील पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. व राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

चौकट
यातील रोहित थोरात हा आतंरराष्ट्रीय पातळीवर कझाकिस्तान येथे सँम्बो स्पर्धेत खेळला होता तर मागील महिन्यात अमरावती येथे झालेल्या वुशू राज्यस्तरीय स्पर्धेत श्रेयस वराटने रौप्य पदक जिंकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here