जामखेड न्युज——
नागपंचमी निमित्त आयोजित आनंदनगरीचा लाभ घ्यावा – संपत (नाना ) राळेभात
आनंद नगरीचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या हस्ते उद्घाटन

जामखेड शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरवण्यात आलेल्या नागेश्वर आनंदनगरीचे उद्घाटन कर्जत जामखेड चे उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. या नागपंचमीचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संपत (नाना) राळेभात यांनी केले आहे.

जामखेड शहरातील ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात व नागेश विद्यालयाजवळील व बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील मैदानावर नुकतीच भव्य आशी आनंदनगरी भरलेली आहे. या नागेश्वर आनंद नगरीचे उद्घाटन आज दि 21 ऑगस्ट रोजी दुपारी कर्जत जामखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

दोन्ही ठिकाणी भरवण्यात आलेल्या नागेश्वर आनंदनगरी मध्ये आकाशी पाळणे, ब्रेक डान्स, मौत का कुआ, टोरा टोरा, रेल्वे, बोट, ड्रॅगन, पन्नालाल, स्लॉम्बो, महीलांसाठी कटलरी दुकाने, लहान मुलांचे विविध करमणूकीची साधने अशा प्रकारे आनंदनगरीचा मेळा भरला आहे. त्याचा तिकीट दर माफक दरात ठेवण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन आयोजक संपत (नाना) राळेभात यांनी केले आहे.
उद्याटना दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, आनंदनगरीचे आयोजक संपत (नाना) राळेभात, पृथ्वीराजे राळेभात, आकाश पिंपळे, पांडुराजे भोसले, ओम राळेभात, पवन राजगुरू, कृष्णा शिंगणे सह पृथ्वीराजे ग्रृपचे सर्वच मित्र मंडळ उपस्थित होते.









