Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या मुलाला लिव्हर दान करणाऱ्या माता सौ. सिंधूताई औटे यांचा कुटुंबासह मुख्यमंत्र्यांचे हस्ते...

मुलाला लिव्हर दान करणाऱ्या माता सौ. सिंधूताई औटे यांचा कुटुंबासह मुख्यमंत्र्यांचे हस्ते सन्मान मा. आ. भिमराव धोंडे, प्रा. गाडे यांचे मोलाचे सहकार्य – संदीप औटे

0
150

जामखेड न्युज——

मुलाला लिव्हर दान करणाऱ्या माता सौ. सिंधूताई औटे यांचा कुटुंबासह मुख्यमंत्र्यांचे हस्ते सन्मान

मा. आ. भिमराव धोंडे, प्रा. गाडे यांचे मोलाचे सहकार्य – संदीप औटे

 

स्वताच्या जिवाची पर्वा न करता मुलाला लिव्हर देऊन त्याचा जीव वाचवला आज नऊ वर्षांनंतर आई आणि मुलगा दोघेही ठणठणीत आहेत. मुलांसाठी लिव्हर दान करणाऱ्या सौ. सिंधूताई बबनराव औटे या मातेचा कूटूंबासह मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई येथे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात औटे कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अवयवदान चळवळीला प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सह्याद्री अतिथी गृह मलबार हिल मुंबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २०१४ मध्ये संदीप बबनराव औटे यांना लिव्हर सिरोसिसचा आजार झाला होता. लिव्हर खराब झाल्याने ते बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे जाऊन आले पण हि शस्त्रक्रिया शक्य नव्हती, शेवटी हैदराबाद येथे कठीण व खर्चिक अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. आर्थिक परिस्थिती बेताची असुन देखील वडील व नांदा येथील माजी सरपंच बबनराव औटे यांनी अल्पशिक्षित असुन सुद्धा मुलांसाठी नातेवाईकांकडून उसनवारी करून हे काम पुर्ण करुन दोघांचाही जीव वाचविला. संदीप औटे हे पेशाने शिक्षक असल्याने त्यांना शासनाकडून वैद्यकीय खर्च मिळणे अपेक्षित होते परंतु त्या आजारांसाठी वैद्यकीय बिलात तरतुदच नव्हती. त्यामुळे झालेला ३५ ते ४० लाख रुपये मिळणे मुश्कील झाले. परंतु आजारातुन बरे झाल्यावर संदीप औटे यांनी वैद्यकीय बिलासाठी प्रयत्न केले. आष्टी ते बीड व मुंबई अशा चकरा मारुन संबंधित मंत्री महोदयांना भेटून काही प्रमाणात का होईना बिलाला मंजुरी मिळवली.


मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हा खर्च मिळवण्यासाठी तत्कालीन आ.भिमराव धोंडे, अहमदनगर शिवसेनेचे नेते प्रा.शशिकांत गाडे,जि. प. च्या माजी अध्यक्षा सौ. सविताताई गोल्हार यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे संदीप औटे यांनी सांगितले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात लिव्हर दात्या माता सौ. सिंधूताई बबनराव औटे, बबनराव औटे, लाभार्थी संदीप औटे, सौ. सारीका संदीप औटे,चि. साईराज औटे, कु. संचिता औटे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तिघांनाही बोलण्याची संधी मिळाली.

बबनराव औटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे व आरोग्याकडे लक्ष देणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे होय. माझ्या कुटुंबाचा यथोचित सन्मान केला व उपस्थित कार्यक्रमात अवयवदान चळवळीचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्याची महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय मदत कक्षाने संधी दिली.

चौकट
मा. आ. भिमराव धोंडे व प्रा. गाडे यांचे मोलाचे सहकार्य -: संदीप औटे

याप्रसंगी ज्या माता सौ. सिंधूताई यांनी आपले लिव्हर स्वताच्या जीवाचा विचार न करता मुलाला दिले ते संदीप औटे यांनी सांगितले की, मला २०१४ मध्ये लिव्हर सिरोसिस हा आजार झाला होता. लिव्हर प्लॅंटेशन ही मोठी खर्चिक बाब होती. खर्चाच्या दृष्टीने सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेरील गोष्ट होती. नातेवाईकांनी आर्थिक सहकार्य केल्याने हे शक्य झाले आहे. त्यानंतर वैद्यकीय बिलासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन आ. भिमराव धोंडे, अहमदनगर येथील शिवसेनेचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांनी मोलाचे सहकार्य केले. माझे काही का होईना पण मुलगा वाचला पाहिजे म्हणून मी लिव्हर मुलाला दिले आज मुलगा धडधाकट झाला याचा मला अभिमान वाटतो आहे असे मातोश्री सौ. सिंधूताई औटे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आईच्या नावाने राज्यातील पहिला कॅशलेस दवाखाना सुरू करून खऱ्या अर्थाने आईला आदरांजली वाहिली आहे. या दवाखान्यात रुग्णांना एक रुपयाही खर्च करावा लागत नाही असे सुत्रसंचालिका ज्योती ताई वाघमारे यांनी या कार्यक्रमात सांगितले. उपसभापती निलम ताई गोऱ्हे, चित्रा वाघ, अहमदनगर येथील अनिल शिंदे, रामहरी राऊत, मंगेश शिंदे, प्रा. गाडे यांचे स्वीय सहाय्यक अशोक झेंडे यांचे या कामी मोलाचं सहकार्य मिळाल्याचे बबनराव औटे यांनी सांगितले. औटे कुटुंबाच्या सत्काराबद्दल भारतीय जनता पक्षाच्या किसान सभेचे अध्यक्ष बबनराव औटे व परिवाराचे माजी आ.भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, माजी आ.साहेबराव दरेकर,पत्रकार किरण जावळे व सौ.बेबी जावळे यांच्या हस्ते सन्मान करून अभिनंदन करण्यात आले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!